युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे पुणे 4 जुलै कोरोना बाधित राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले साने यांना 25जुन रोजी कोरोना ची लागन झाली होती दत्ता साने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक होते चिखली परिसरातून ते तीन वेळा निवडून आले होते लॉक डाऊन काळामध्ये त्यांनी लोकांना भरपूर मदत केली होती अन्नधान्यांचे त्यांनी मोठ्या प्रमाणात वाटप केले त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता 25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते त्यांच्यावर चिंचवड परिसरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले त्यांना कोरूना सह निमोनिया देखील लागन झाली होती नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे