🛑 सोन्याचा भाव उतरला ; जाणून घ्या आजचा दर 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 28 जून : ⭕ विक्रमी स्तरावर गेलेल्या सोन्यामध्ये नफावसुली झाल्याने शुक्रवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. कमॉडीटी बाजारात सोन्याचा भाव ८३ रुपयांनी कमी होऊन ४७८७४ रुपये झाला. गुरुवारी सराफा बाजारात सोने २९३ रुपयांनी स्वस्त झाले होते.
जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १७६३.४८ डॉलर प्रती औंस झाला आहे. त्यात ०.१ टक्के वाढ झाली. तर चांदीचा भाव १७.७४ डॉलर झाला आहे. करोनाने अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे भांडवली बाजारात अनिश्चितता आहे. अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आकर्षित होत आहेत, असे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Good Returns च्या वेबसाईटनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८१० रुपये आहे. चेन्नईत तो ४६१७० रुपये आहे. चेन्नईत २४ कॅरेटचा भाव ५०३८० रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार गुरुवारी दिल्लीत सोन्याच्या किमतींमध्ये २९३ रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव ४९०७२ रुपये झाला. चांदीमध्ये ५९८ रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव ४८७०५ रुपये प्रती किलो झाला.
जागतिक बाजारात मंगळवारी स्पॉट गोल्ड (SpotGold) ०.२ टक्क्याने वाढून १७६९.५९ डॉलर प्रती औंस झाले. २०१२ नंतरची जागतिक बाजारातील सोन्याची सर्वाधिक किंमत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये १७७३ डॉलर प्रती औंस इतकी होती. आर्थिक पॅकेजच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत चालू वर्षात १६ टक्के वाढ झाली आहे.स्थानिक कमॉडिटी बाजारात बुधवारी सोन्याचं किमती ०.४ टक्क्यांनी वधारून ४८४२० रुपयांवर गेल्या. कमॉडिटी बाजारातला हा आतापर्यंतचा सार्वकालीन उच्चांकी दर ठरला आहे. याआधी ४८२८९ रुपयांचा रेकॉर्ड होता.
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बड्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. परिणामी भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंत करत आहेत. महागाई आणि चलनातील अवमूल्यनाला हेजिंगचा भक्कम पर्याय म्हणूनदेखील सोने गुंतवणूकदारांना वरदान ठरत आहे.
सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतीयांकडे २२००० ते २५००० टन सोने आहे. त्यापैकी ६५ टक्के सोने हे ग्रामीण भारतात आहे. या अवाढव्य सोन्यापैकी केवळ १.२ टक्के सोने गहाण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गोल्ड लोन व्यवसायात प्रचंड संधी असल्याचे जाणाकरांचे म्हणणे आहे.⭕