Home Breaking News पुण्यात ६००० कोटींची गुंतवणूक ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा...

पुण्यात ६००० कोटींची गुंतवणूक ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

146
0
  • 🛑 पुण्यात ६००० कोटींची गुंतवणूक 🛑
    ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई –⭕ लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती बिघडलेली असतानाच सोमवारी “मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’चा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध 12 देशांतील गुंतवणूकदारांसोबत 16030 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
हे करार अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणूकदारांसोबत करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्र्यांच्या उपस्थित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले.
एकीकडे करोनाशी लढताना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्‍वास दाखवला. तो आम्ही सार्थ ठरवू. यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, असे आश्‍वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुकेश आघी व वेणुगोपाल रेड्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. डब्ल्यूएआयपीएचे बोस्तजन स्कलार यांनी देखील डब्ल्यूएआयपीएच्या वतीने स्वाक्षरी केली…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here