आशाताई बच्छाव
सामाजिक परिवर्तनाचे अहिंसात्मक माध्यम म्हणजे लोकशाही.- डॉ. सुधीर गव्हाणे
( कै.नारायणराव चिद्रावार स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन)
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर :-
कोणत्याही रक्तपाताशिवाय सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे लोकशाही आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया मजबूत आणि भक्कम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण झाले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशांमध्ये एकूण 648 संस्थानिक होते ते कधीच एकत्र नव्हते परंतु या सर्व संस्थानिकांना एकत्रित करण्याचे काम भारतीय लोकशाहीने केले आहे. लोकशाहीमुळेच भारतातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सामाजिक , राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक असे मूलभूत हक्क प्राप्त झाले असून प्रत्येकाला दर्जाची व संधीची समानता भारतीय संविधान व लोकशाहीने प्राप्त करून दिलेली आहे. त्यासाठी लोकशाही हेच समाज परिवर्तनाचे एकमेव व अत्यंत प्रभावी व रक्तविरहित माध्यम आहे.
आज भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि देशाची विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे हेच लोकशाहीचे फलित आहे.महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, अस्पृश्य असे सर्व जाती व धर्मातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम लोकशाहीने केलेले आहे. भारतातील लोकशाही वाचली तरच आपण वाचू , समाज वाचेल यासाठी लोकशाही मूल्यांची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिकचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. ते कै. नारायणराव चिद्रावार स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून 39 वे पुष्प गुंफताना बोलत होते.
या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी देगलूर बिलोली- मतदार संघाचे आमदार जितेश अंतापुरकर होते. तर व्यासपीठावर नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. रवींद्र पा. चव्हाण, अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पा. बेम्बरेकर व डॉ.किरण चिद्रावार हे होते. प्रारंभी कै.नारायणराव चिद्रावार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणातून किरण चिद्रावार यांनी कै.नारायणराव चिद्रावार यांच्या जीवनावर व देगलूर शहरात केलेल्या विविध विकास कामावर प्रकाश टाकला. या प्रसंगी खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी कै. बळवंतराव पा. चव्हाण व कै. कै.नारायणराव चिद्रावार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबध होते तसेच कै. वसंतराव चव्हाण यांचेही चिद्रावार परिवाराशी आपुलकीचे व कौटुंबिक संबंध होते. चिद्रावार परिवारातील एकूण तीन पिढ्यापासून नायगांवच्या चव्हाण परिवाराचा संबंध आहे.
या परिवाराने देगलूरच्या सामाजिक,शैक्षणिक, व्यावसायिक ,संस्कृतीक व अध्यात्मिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे व आजही नारायणराव चिद्रावार यांच्या स्मृति प्रीत्यर्थ मोफत शस्त्रक्रिया शिबीर घेवून गरीब व उपेक्षित लोकांची सेवा करण्याचे महत्वपूर्ण कार्य विशेष नोंद घेण्यासारखे आहे. असे गौरोद्गगार त्यांनी काढले. तर अध्यक्षीय सामारोपातून आमदार जितेश अंतापुरकर यांनी चिद्रावार व्याख्यानमाला ही मागील 39 वर्षापासून सुरु आहे ही देगलूरच्या वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय बाब आहे, डॉ.रवींद्र चिद्रावार , डॉ. किरण चिद्रावार व परिवाराने अशीच सामाजिक बांधिलकी जपावी व देगलूरच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ.बी.आर. कतुरवार यांनी केले तर हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष येरावार यांनी आभार मानले. प्रारंभी प्रा. गौतम भालेकर व प्रकाश सोनकांबळे यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले तर प्रा.डॉ. सर्जेराव रणखांब यांनी पाहुण्याचा परिचय करुण दिला. कार्यक्रमास अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष विलास तोटावार, कार्यकारिणी सदस्य सुर्यकांत नारलावार , देवेंद्र मोतेवार , रवींद्र अप्पा द्याडे , चंद्रकांत नारलावार , डॉ.रवींद्र चिद्रावार, श्री प्रकाश चिद्रावार श्री अरुण चीद्रावार, गुरुराज चीद्रावार, डॉ. अनिल चिद्रावार अड् मोहसीन आली , माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार व नंदकुमार दाशेटवार ,डॉ. जनार्धन भूमे, डॉ. विनायक मुंडे, डॉ. शेख मुजीब, डॉ. लाडके, बसवराज पाटील नागराळकर , साईनाथ मेढेवार , कैलास येसगे , उमेश पाटील झरीकर , वाय. जी. सोनकांबळे , यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते