आशाताई बच्छाव
बच्चू कडू यांच्या संचालक पदाचा वाद नवीन वळणावर उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे एडीसीसी बँकेतील पद कायम.
पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे येडीीसी अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या संचालक पदाचा वाद आता नवीन वळणावर आला आहे कडू यांच्यावतीने बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ठेके आणि संचालक आनंद काळे यांनी विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीस यांच्याकडे शपथपत्र सादर केले आहे बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोळ यांनी केलेल्या तक्रारीनुसार कडू यांना एका प्रकरणात एक वर्षाहून अधिक काळाची शिक्षा झाली होती बँकेचे उपविधीनुसार अशा शिक्षेमुळे संचालक पद रद्द होते त्यामुळे कडू यांचे संचालकत्व आणि अध्यक्ष पद रद्द करण्याची मागणी करण्यातात आली होती मात्र कडू यांनी न्यायाला धाव घेतली.त्यांना मिळेल मिळालेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे या स्थगितीच्या आधारे आता त्यांच्या वतीने नवे शपथ पत्र दाखल करण्यात आले आहे शपथपत्रात म्हटले आहे की ज्या निकालाचा आधारे संचालकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे त्या निकालाचा स्थगिती मिळाली असल्याने हे प्रकरण रद्द व्हायला हवे विभागीय सहनिबंधकांनी१८मार्चला, कडू यांना आपले मान्य मांडण्याची शेवटची संधी दिली होती त्यानुसार सादर करण्यात आलेल्या या शपथ ही मुळे सध्या तरी कळू यांचे संचालकत्व कायम राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.