आशाताई बच्छाव
माहोरा येथे जागतिक महीला दीन व महीला ग्रामसभा कार्यक्रम संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 09/03/2025
आज दिनांक 08/03/2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामसंसद कार्यालय माहोरा येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालविवाह रोखने, पतीच्या निधनानंतर रूढी व अंधश्रद्धा यामुळे महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, मुलीचा जन्मदर वाढवा यासाठी प्रयत्न करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करणे या संदर्भात सरपंच श्री. गजाजन पाटील लहाने, श्री. पंचायत अधिकारी श्री. आर. बी. दांडगे साहेब, पंचायत अधिकारी संजीवनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. गडकरी अण्णा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच श्री. गजाजन पाटील लहाने, उपसरपंच श्री. बाबासाहेब बोरसे, पंचायत अधिकारी श्री. दांडगे साहेब, पंचायत अधिकारी संजीवनी पाटील, सर्व ग्रा. पं. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री. गडकरी अण्णा, अंगणवाडी ताई, आशा वर्कर, बचत गट महिला, पत्रकार श्री. संतोष गौरकर, श्री. विलास लहाने, लक्ष्मन वाघ, विकास जाधव, विजय इंगळे व गावातील ईतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.