आशाताई बच्छाव
अहिल्यानगर (प्रतिनिधी दिपक कदम):– प्राथमिक शिक्षण आपल्या उज्वल भविष्याचा पाया असतो. बाल वयात ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेऊ त्या पद्धतीने आपल्या आयुष्याची जडणघडण होते.वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये देण्यात येत असलेले शिक्षण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाची भर घालणारे शिक्षण आहे, अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवासी आपल्याकडे आवर्जून व्यक्त करतात* . असे गौरवउद्गार अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा बारस्कर यांनी व्यक्त केले.
वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ कॉटेज कॉर्नर येथील आशिष कॉलनीत शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेव पांडुळे मामा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कवी सुभाष सोनवणे, बबनराव गिरी, संचलिका शर्मिला गोसावी, सौ. किरण बारस्कर, अंगणवाडी सेविका सौ. सगळगिरे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना संपत दादा बारस्कर म्हणाले की,शिक्षिका शर्मिला गोसावी यांनी स्कूलचे रोपटे लावले, ते मोठ्या वृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही, संस्था मोठी व्हावी, अशा सदिच्छा सर्वजण देतात, या कार्यक्रमासाठी मागे आलो होतो तेव्हा आणि आता परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे. प्राथमिक जीवनात मुलांना इंग्रजीतून शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे. आजचे शिक्षण मुले मोबाईलवर घेतात त्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी वॉरियर्स प्रि स्कूल चा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची वाढवतो आणि त्यांना मोबाईल पासून दूर ठेवतो.
अध्यक्षपदावरून बोलताना पांडुळे मामा म्हणाले की, इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते घेऊन नवी पिढी आपल्या व्यावसायिक आयुष्यात गुरगुरली पाहिजे. इंग्रजी माध्यमातून मुलांनी शिक्षण घेतले तर त्यांना उच्च शिक्षण घेताना त्यांचा इंग्रजीचा पाया भक्कम असल्याने कोणत्याच विषयात अडचणी येत नाहीत. मुलांना वॉरियर्स प्री स्कूल मुलांना संपन्न बनवते.
यावेळी राजेंद्र चोभें, बबनराव गिरी, सौ.किरण संपत बारस्कर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. नृत्य, नाटिका, भाषण आणि कविता सादरीकरण मुलांनी केले आणि पालकांनी,उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव भुकन व हर्षली गिरी यांनी केले. शेवटी दिशा गोसावी हिने आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, सुरेखा घोलप, शर्मिला रणधीर, श्यामा मंडलिक, आरती गिरी, संगीता गिरी, वर्ष गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.