आशाताई बच्छाव
दुचाकी पार्किंगच्या वादातून एकास मारहाण. अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
दुचाकी पार्किंगच्या वादातून सात जणांच्या टोळक्याने एकाला धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केले. सुदर्शन मोहन गोहेर (वय ४४, रा. वडारवाडी रस्ता, शहा फेब्रीकेशनच्या मागे, नागरदेवळे, ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश पुरण वैद्य, प्रवीण बिल्लु घावरी, नीतेश बिल्लु घावरी, रोहन प्रवीण घावरी, बिल्लु घ्यासी घावरी, रश्मी नीतेश घावरी, रजणी प्रवीण घावरी (सर्व रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुरूवारी दुपारी यश वैद्य याने फिर्यादीच्या घरासमोर दुचाकी लावली. त्यावेळी फिर्यादीने त्याला दुचाकी काढण्यास सांगितली असता यश वैद्य याने थांब, तुला दाखवतो असे म्हणत अन्य सहा साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर हल्ला केला. लाकडी दांडक्याने तसेच चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले.