आशाताई बच्छाव
मालेगांवी जय शिवराय ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम-श्री शिवजन्मोत्सव नाचून नाहीतर वाचुन साजरा करण्याचा निर्धार
मालेगाव – आज संपूर्ण देशभरात साज-या होत असलेल्या शिवजयंती महोत्सवात जय शिवराय ग्रुपच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती जय शिवराय ग्रुपचे संस्थापक आंशुराज राऊत व पदाधिकारी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी “नाचून नव्हे तर वाचून” जयंती उत्सव साजरा करण्याची संकल्पना वरीष्ठ पदाधिकारी श्री विजय किशन लाडके व श्री गोपाल बापु ओढेकर
यांच्या प्रेरणेतून घेऊन आजचा जयंती सोहळा शिव चरित्रांची पुस्तके भेट देऊन आणि निराधार व गरीब नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात येऊन साजरा केला जाणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भागवत भाऊ रणसिंह श्री भारत मुकुंद माने श्री प्रविण वामनराव क्षिरसागर श्री मंगेश नंदु वानखेडे श्री सतिश पन्नालाल जाधव श्री योगेश रंगनाथ देवरे श्री भारत मनोहर मोहिते श्री अनिल किशोर तुपे श्री शुभम गोपाल ओढेकर ओम राजु गाडेकर गौतम महेंद्र कावळे महेश जय सरनाईक विशाल निवृती गायकवाड कुणाल गणेश नाटेकर गोपाल निलेश सरनाईक व आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत तर हे आयोजन जय शिवराय ग्रुप मालेगाव शहरच्या वतीने करण्यात आला आहे.