आशाताई बच्छाव
व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे स्थानिक
आमदार खासदारचा काळ्याफिती लावून व्यापाऱ्यांनी केला निषेध
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –गेली सात दिवसापासून गांधी पुतळा या ठिकाणी अतिक्रमणामध्ये काढलेल्या श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदाराचे पुनर्वसन करून तात्पुरत्या स्वरूपात पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी12 फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून श्रीरामपूरकरांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार हेमंत ओगले तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे साधी फोनवर विचारपूस सुद्धा केली नाही म्हणून श्रीरामपूरातील व्यापाऱ्यांच्या आमदार हेमंत ओगले खासदार भाऊसाहेब वाकचौरे विषयी भावना तीव्र झाल्या असून आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्या निषेध पर घोषणा देऊन तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यावेळी व्यापारी विशाल साबद्रा म्हणाले की पोलीस स्टेशन समोर माझे बंधू संदीप साबद्रा यांचे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन समोर गेली 40 वर्षापासून होल सेल मसाल्याचे दुकान होते परंतु 28 फेब्रुवारी श्रीरामपूर नगरपालिकेने आमच्या बंधूंचे दुकान जेसीबीने जमीन उद्ध्वस्त केले ते आमच्या भावाने पाहिल्याने त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा त्यात मृत्यू झाला त्याला जबाबदार श्रीरामपूर नगरपालिकाच असून सरकारने आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे तसेच माझे बंधू मयत संदीप सावद्रा हे मयत होऊन दहा-पंधरा दिवस झाले परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार व खासदार आमच्या कुटुंबाला भेटायला आले नाही तसेच शांतन पर फोन केला नाही तसेच व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी गांधी पुतळा या ठिकाणी विस्थापित व्यापाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलनाला चालू आहे परंतु स्थानिक आमदार हेमंत उगले खासदार भाऊसाहेब वाकचौरे भेटायला आले नाही किंवा आंदोलनला पाठिंबा दिला नाही त्यांचा मी व्यापाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो कारण आमदार श्रीरामपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाला हजेरी लावायला वेळ आहे परंतु आमच्या आंदोलनाला वेळ नाही आमदार या नात्याने त्यांनी आम्हाला पाठिंबा देणे किंवा फोन करणं अत्यंत गरजेचे होते परंतु त्यांनी ते केले नाही त्यांना दिसेल तिथे व्यापारी लोक जबा विचारतील यात शंका नाही यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये किशोर ओझा श्याम श्रीवास्तव राकेश थोरात असदुद्दीन अत्तार प्रदीप निकुंभ ओंकार बारस्कर शब्बीर मणियार जयसिंग देवकाते आदिनाथ सुपेकर आशिर सय्यद मजीद मेमन लक्ष्मी कुवर कैलास बाविस्कर असलम अत्तर बॉबी सहानी विशाल सावद्रा आदी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते