Home भंडारा जीवनबोधी बौद्ध हे धम्म व महापुरुषांच्या विचाराकरता समर्पित व्यक्तिमत्व

जीवनबोधी बौद्ध हे धम्म व महापुरुषांच्या विचाराकरता समर्पित व्यक्तिमत्व

117
0

आशाताई बच्छाव

1001242167.jpg

जीवनबोधी बौद्ध हे धम्म व महापुरुषांच्या विचाराकरता समर्पित व्यक्तिमत्व

जीवनबोधी बौद्ध (मेश्राम) हे मूळ चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून अत्यंत गरीब परिस्थितीतून आपले उदरनिर्वाह करून व मुलांच्या सांभाळ करून परिस्थिती अत्यंत भयानक असताना अशा परिस्थितीत चिचाळ गाव सोडून ते नागपूर येथे स्थलांतरित झाले व तेथे मिळेल ते काम करून आपला प्रपंच करू लागले. त्यांनी आपल्या दोन मुलांच्या व पत्नीच्या सहकार्याने चिचाळ या ठिकाणी २ एकर जमीन खरेदी करून समाजाचा आपल्याला काही देणं आहे म्हणून त्यांनी विहाराच्या बांधकामा करिता 2007 मध्ये 2 एकर जमीन खरेदी केली. दिनांक 17 मे 2011 ला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विहाराचे बांधकाम करण्यात आले. शांतीवन बुद्ध विहार हे धम्माचेच केंद्र नसून धम्म चळवळीचे केंद्र आहे .या शांतीवन बुद्ध विहारांमध्ये अनाथ मुलांना आणून त्यांच्या शिक्षण ,जेवणाची ,निवासाची व्यवस्था करण्याचा सुद्धा या संस्थेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे 28 फरवरी 2015 ला तथागत बुद्धांचे विहार स्थापन केले. विहाराच्या परिसरामध्ये भिक्षु संघ करिता व उपासक संघाकरिता रूम बांधकाम केले .तसेच दिनांक 2/8 /2 2019 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली .दिनांक 16 मे 2022 ला शिवली बोधी यांच्या मूर्तीची स्थापना व अशोक स्तंभ स्थापना केली. 26 नोव्हेंबर 2022 ला प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती मूर्तीची स्थापना करण्यात आली .त्याचप्रमाणे 28 फरवरी 2023 ला संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ..2025 ला सुद्धा तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सुद्धा 28 फरवरी 2025 ला करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 2026 ला ध्यान साधना शिबिर केंद्र स्थापन होत असून या केंद्रामध्ये 200 उपासक उपाशीका बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.हे करण्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसून समाजाच्या हिताकरिता , सुखाकरता आहे. हे सर्व करीत असताना लोक वर्गणीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाचा काही भाग या कामाकरता खर्च करीत आहेत .आज ते सुखाने जीवन जगू शकत होते. परंतु त्यांना धम्माची आवड असल्यामुळे साधी साधी राहणी उच्च विचार या म्हणी प्रमाणे त्यांनी आपल्या धम्माचे कार्य व महापुरुषांचे विचार या शांतीवन विहाराच्या माध्यमातून त्यांनी पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे.
(संकलन पत्रकार संजीव मुरारी भांबोरे)
मु.पो पहेला तालुका जिल्हा भंडारा )

Previous articleसाक्री तालुका महिला शिवसेना प्रमुखपदी सौ.यामिनीताई दहिते यांची निवड
Next articleशनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानचा निर्णय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here