Home उतर महाराष्ट्र रब्बी हंगामासाठी सोमवारपासून आवर्तन

रब्बी हंगामासाठी सोमवारपासून आवर्तन

59
0

आशाताई बच्छाव

1001239679.jpg

रब्बी हंगामासाठी सोमवारपासून आवर्तन.                 अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी सोमवारी (ता. १७) पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभगाच्या अधिकाऱ्यानां दिल्या आहेत. यापूर्वी मुळा उजवा कालव्याचे रब्बी आवर्तन ठरलेल्या नियोजना प्रमाणे पूर्ण झाले आहे.
उन्हाळी आवर्तन १ मार्च पासून करण्याचे नियोजन होते. परंतू लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. याबाबत आमदार मोनिका राजळे आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांनीही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून १७ फेब्रुवारी पासूनच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here