आशाताई बच्छाव
अतनुरात ” नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण मेळावा ” संपन्न
अतनूर / प्रतिनिधी
आज मौजे अतनूर ता.जळकोट येथे ” नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण मेळावा ” कार्यक्रम संपन्न झाला.
या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जळकोट तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना विषयी सविस्तर असे मार्गदर्शन करून ॲग्री स्टॅक या योजनेअंतर्गत सर्वांनी आपले शेतकरी कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पामध्ये अतनूर गावची निवड झाली आहे. सदरील योजनेचे स्वरूप व योजनेचे उद्दिष्ट फायदे तसेच प्रकल्पांतर्गत येणारे शेडनेट उभारणी व शेडनेट मधील भाजीपाला व गोडाऊन याविषयी मार्गदर्शन करून पोकरा योजना शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कशी महत्त्वाची ठरेल व शेतकऱ्यांनी त्याचा कशाप्रकारे लाभ घ्यावा व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या योजनेविषयी सविस्तर असे मार्गदर्शन करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकरी गटासाठी असणाऱ्या अवजारे बँक शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरा इत्यादी बाबी विषयी मार्गदर्शन केले व पोकरा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकरी गट स्थापन करून शेतकऱ्यांनी पोकरा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. अतनूर गावचे कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून ॲग्री स्टॅक योजना रब्बी हंगामातील विविध पिके याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदरील मेळाव्यामध्ये संगणक चालक राम सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांचे नमो शेतकरी महासन्माननिधी योजने विषयी शंका अडी अडचणी कॅम्प पद्धतीने सोडविण्यात आल्या.
सदरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, शिवाजीनगर, अतनूर तांडा, मरसांगवी, रावणकोळा तसेच अतनूर परिसरातील गाव,वाडी, तांडा, वस्तीतील शेतकरी, कृषी शेतकरी गटातील शेतकऱ्यांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, महिला सदस्या, सदस्य सह दिलीप कोकणे, प्रमोद संगेवार, गोविंद येवरे, सूर्यकांत येवरे, संजय कुलकर्णी, ईश्वर कुलकर्णी, शेतकरी गटाचे अध्यक्ष शिवराज रेड्डी, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, आनंद सोमुसे, अंकुश बाबर, राजेसाहेब मुंजेवार, शांताबाई जाधव, लक्ष्मीबाई भांगे, विलास सोमुसे, ईरबा घोडके, व्यंकटराव गव्हाणे, शिवराज पंचगले, दत्तात्रय सोमुसे, ऋषी रेड्डी, माधव रेड्डी, ज्ञानोबा सोमुसे, आनंद सोमुसे, बाबुराव शारवाले, महावीर बिचकुंदे, कृषीमित्र तथा दलितमित्र बी.जी. शिंदे अतनूरकर, अतनूर परिसरातील सर्व शेतकरी गटांचे पदाधिकारी व भूधारक, अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक संदीप पाटील, आत्माचे अभिलाष क्षीरसागर, जळकोट तालुका कृषीचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, महाराष्ट्र शासन नियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर इत्यादी सह महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.