आशाताई बच्छाव
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
अहिल्या नगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे
सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.