आशाताई बच्छाव
13 फेब्रुवारीला आमला विश्वेश्वर येथे रंगणार लाल मातीतील कुस्तीची दंगल.
दैनिक युवा मराठा
पीएनदेशमुख.
अमरावती विभागीय संपादक
अमरावती.
चांदुर रेल्वे तालुक्यातील अमला विश्वेश्वर येथे संत एकनाथ महाराज संस्थेतर्फे संत एकनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या धार्मिक महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता कुस्तीची दंगल श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहयोगाने आयोजन करण्यात आलेली आहे स्वर्गीय अण्णाजी उर्फ शेषराव ढेरे व स्वर्गीय दादासाहेब सोनारकर यांच्या स्मृति प्रत्यर्थ सदर आयोजन केलेले जात आहे त्यामध्ये विविध गटातील विजेत्यांना रोख रक्कम दिले जाणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागामध्ये लाल मातीत महिला तसेच पुरुषांची कुस्त्या रंगणार आहे पुरुष गटामध्ये तीन गट असणार *१ ला* *गट* पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 21000 द्वितीय क्रमांक बक्षीस 11000 *२ रा* *गट* पहिल्या क्रमांकास बक्षीस 7000 दुसऱ्या क्रमांकास बक्षीस 4000 *३ रां*गटास* प्रथम बक्षीस 7000 द्वितीय बक्षीस 4000 तसेच *महिला महिला विभागात* *१ गटास* प्रथम बक्षीस 11000 द्वितीय बक्षीस 5000 *२ रा गटास* प्रथम बक्षीस 7000 द्वितीय बक्षीस 4000 *३ गटास* प्रथम बक्षीस 5000 द्वितीय बक्षीस 3000 असे बक्षिसाची रक्कम असून एक नंबर त्या विजेत्या पैलवानास पुरुष गटात आकर्षक बक्षीस *स्वर्गीय भुजंगराव डहाके, तळेगाव ठाकूर* यांच्या स्मृति प्रित्यर्थ *चांदीची गदा* बक्षीस देण्यात येईल त्यावेळी अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी तेजस्वी कोरे , पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची उपमुख्य अधिकारी मा.संजय खारकर ,चांदूर रेल्वेचे तहसीलदार श्रीमती पूजा माटोडे, सहायक पोलीस निरीक्षक म.अनुप वाकडे, गटविकास अधिकारी श्रीमती तेजस्वी आवळे, आदिची उपस्थित राहणार आहे. आयोजनाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात येईल समारंभाचे मुख्य आयोजक *राजेश ज्ञानेश्वर गोफने व राजेंद्र ढेरे* यांच्याकडे ही जबाबदारी दीलेली आहे या स्पर्धेत अधिकाधिक कुस्तीपटूंनी सहभाग व्हावा असे आव्हान प्रा. डॉ.संजय तिरथकर (विदर्भ केसरी) यांनी केले आहे . स्पर्धा यशस्वी करण्याकरता आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच डॉ रणबिर सिंह राहल, भारतीय खेल प्राधिकरणाचे कुस्ती कोच जितेंद्र भुयार , समीर देशमुख , इरफान खान, जितेंद्र डिके, अतुल तायडे, रुपेश तिरथकर, दिलीप इटणकर, प्रशांत अडसूळ तसेच आमला विश्वेश्वर येथील नागरिक तसेच कुस्तीप्रेमी अथक परिश्रम करत आहे. आमला विश्वेश्वर येथील धार्मिक उत्सव व कुस्तीच्या दंगलीची परंपरा 70, 80 वर्षापासून सुरू आहे.