आशाताई बच्छाव
कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेतल्या जाणाऱ्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत पार पडल्या या परीक्षेत पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२५) ८ वी च्या एकुण १४० विध्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १३५ विध्यार्थी परीक्षा दिले असुन ५ विध्यार्थी अनुपस्थित होते पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून श्री. चव्हाण डी. बी.हे अतीशय उत्कृष्ट रीतीने आपले काम पाहिले यावेळी बैठे पथक म्हणून डॉ. केरबा कांबळे सर व मुख्याध्यापक श्री. बि.एस.मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडली पर्यवेक्षक म्हणून श्री जाधव सर, पडिले सर, भंगे सर, मुळे सर, बोबडे सर व ममताबादे एस एस यांनी कार्य केले.अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलिस ठाणे मुक्रमाबाद येथील पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली ASI शिवाजी आडेकर साहेबांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.परीक्षा सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या.