आशाताई बच्छाव
साक्रीच्या टिटाणेत युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे शानदार प्रकाशन
साक्री,(संदीप पाटील तालुका प्रतिनिधी)- साक्री तालुक्यातील टिटाणे गावी काल दिनांक ६ रोजी आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे शानदार प्रकाशन करण्यात आले.
युवा मराठा महासंघाच्या माध्यमातून दरवर्षी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्यातूनच दरवर्षी दिनदर्शिका कँलेडर प्रकाशित करण्यात येते.या वर्षांची आकर्षक व सप्तरंगी असलेली दिनदर्शिका कँलेडर २०२५ चे शानदार प्रकाशन करुन लोकार्पण करण्यात आले.यावेळी साई दरबार हाँटेलचे मालक आणि युवा नेते प्रशांत देवरे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र देवरे, सामाजिक कार्यकर्ते कलिम पिंजारी यांच्या हस्ते दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करण्यात आले.