आशाताई बच्छाव
अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद अहिल्या नगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
घोडेगाव (ता. नेवासा) येथे अवैध वाळू वाहतूक करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. ५) जेरबंद केला. त्याच्याकडून ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश शंकर व्यवहारे (वय २४, रा.चिंचबन रोड, नेवासा, ता.नेवासा) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव-मिरी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली.