आशाताई बच्छाव
शेतकरी हाच खरा उद्योजक_
डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)शेती करत असताना विविध अडचणीना सामोरे जाऊन त्यामध्ये नैसर्गिक, अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती, कीड रोग, अशा विविध नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन शेतामध्ये राब राब राबवून दहा किलो बियाण्याचे 30 क्विंटल चांगल्या गुणवत्तेचे धान्याचे उत्पादन हा शेतकरी करत असतो.
आणि म्हणूनच या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे संबोधले जाते.
शेतकरी हा केवळ शेतकरी न राहता तो उद्योजक कसा बनेल त्याकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी अशा विविध उपक्रमातून त्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव, आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन विविध प्रदर्शनातून आपल्या चांगल्या गुणवत्तेच्या शेतीमालाची विक्री करून शेतकरी बांधवांनी केवळ उत्पादक न राहता एक चांगल्या प्रतीचे शेती उत्पादन उत्कृष्ट पॅकेजिंग ब्रॅण्डिंग, आणि मार्केटिंग करून विक्री प्रक्रिया कशी करता येईल याकरिता कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा अंतर्गत आयोजित सूरगंगा तांदूळ व धान्य महोत्सव तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर सिविल लाईन येथे आयोजित उद्घाटक म्हणून शेतकऱ्यांना प्रतिपादन केले.
शेतकऱ्यांनी शेती करत असताना केवळ भात पिकाची शेती न करता जमिनीच्या मगदूराप्रमाणे, वातावरणातील बदलानुसार, भाजीपाला फळबाग फुल शेती, सोबतच मत्स्य, डेरी आणि रेशीम मधुमक्षिका पालन, अशा विविध शेती आणि दुय्यम जोडधंदा करून शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक उद्योजक आणि उत्कृष्ट विक्रेता कसे होता येईल याचे ज्वलंत उदाहरण म्हणून शसुरगंगा तांदूळ व धान्य महोत्सव प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
दिनांक 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत आयोजित सूरगंगा तांदूळ व धान्य महोत्सव उद्घाटन डॉक्टर संजय कोलते, जिल्हाधिकारी भंडारा यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
सदर तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजक राजर्षी छत्रपती शाहू महाराज बचत गट भुसा येथील अजित कुमार गजभिये यांनी तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेला शेतीमाल त्यामध्ये उत्कृष्ट तांदूळ डाळी भाजीपाला फुले फळे आणि इतरही कृषी उत्पादने ही शेतकऱ्यांना एक विक्रीचे दालन असून या कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना तयार करून दिले.
शेतकरी हा केवळ शेतकरीच न राहता त्यांनी उत्पादित केलेल्या हा कसा विकता येईल आणि त्यासाठी एक हक्काची बाजारपेठ म्हणून या सूररगंगा तांदूळ व धान्य महोत्सवाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक नियोजन पूर्व म्हणून तयार करून दिले.
सदर महोत्सवाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, भंडारा श्रीमती संगीता माने, प्रकल्प संचालक आत्मा भंडारा श्रीमती उर्मिला चिखले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील डॉक्टर उषाताई डोंगरवार, उपविभाग कृषी अधिकारी म्हणून भंडारा पद्माकर गीदमारे, तालुका कृषी अधिकारी नामदेव काशीद, जिल्हा मृदा सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी वृषाली देशमुख आणि शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी आणि या महोत्सवादरम्यान 45 ते 55 नोंदणीकृत स्टॉल त्यामध्ये यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
सदर महोत्सवाचे रीतसर प्राथमिक सतीश वैरागडे तालुका तंत्रज्ञान भंडारा आत्मा यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वृषाली देशमुख जिल्हामृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा यांनी केले.
Box
जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी उपस्थित शेतकरी शेतकरी बांधवांनी केवळ भाताची शेती न करता आपल्या शेतामध्ये फळबाग, भाजीपाला, फुल शेती, मत्स्य व्यवसाय, रेशीम मधुमक्षिका पालन आणि डेरी,शिंगाडा लागवड इत्यादी विविध कृषी आणि कृषी पूरक व्यवसाय करून शेतकऱ्यांनी एक आदर्श उद्योजक म्हणून आपल्या परिवाराची आर्थिक उन्नती कशी होईल याकडे बघावे त्याकरिता प्रशासन विभाग आपल्या सोबत राहील आणि आपल्याला सर्वतोपरी मदत करेल असे आव्हान केले.