आशाताई बच्छाव
ई पास मशीनवर एका नवऱ्याच्या दोन बायकांचा इंटरनेट कनेक्ट
दुकानदारांची डोकेदुखी वाढली ग्राहकांना धान्य वाटप करायचे कसे?
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) ई पास मशीनवर दोन इंटरनेट कनेक्ट बसविली आहेत.परंतु धान्य वाटप करताना डिसेंबर महिन्यात पंधरा दिवसापासून दुकानदारांची डोकेदुखी वाढली असून एका नवऱ्याच्या दोन बायकांचा इंटरनेट कनेक्ट असून सुद्धा ही ईपास मशीन धान्य वाटपाकरिता सज्ज नाही ?तर ही ई पास मशीन कोणत्या कामाची असा प्रश्न रास्त भाव दुकानदारांना पडलेला आहे? बरेच ग्राहक रास्त भाव दुकानात येतात व रिकाम्या हाताने खाली जातात व रास्त भाव दुकानदार यांच्यासोबत भांडण करून आम्हाला हेच काम आहेत का आम्हाला दुसरे काम नाहीत का ? अशी रास्त भाव दुकानदारांची कान उघडणी करतात! मग रास्त भाव दुकानदारांनी करावे काय ?रास्त भाव दुकानदाराची मानसिकता बिघडली असून हार्ट अटॅक मुळे त्यांचा केव्हाही मृत्यू होऊ शकतो याला जबाबदार कोण ! त्यामुळे या ई पास मशीन चा ठेका ज्या कॉन्ट्रॅक्ट दाराकडे असेल त्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन दुकानदारांची समस्या तात्काळ सोडवावी. त्याचप्रमाणे शासनाने ज्या कॉन्ट्रॅक्ट दाराकडे ईपास मशीन चा टेंडर दिलेला आहे याबाबतची शासनाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी.