आशाताई बच्छाव
विशाल मोघे यांची जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी निवड
— ——
देगलूर गजानन शिंदे तालुका प्रतिनिधी: जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी विशाल शंकरराव मोघे रा.सांगवी( क) यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये तसेच त्यांचे मित्रमंडळींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विशाल यांनी आपल्या कठोर मेहनती व चिकाटीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे. शिक्षण संपवून न्यायालयीन क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती, आणि त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
लिपिकपदासाठी घेतलेल्या परीक्षेत त्यांनी उत्तम कामगिरी करून हे पद मिळवले आहे. त्यांची ही निवड कौटुंबिक तसेच सांगवीवासीयांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
विशाल यांनी त्यांच्या यशाचे श्रेय कुटुंबीयांच्या पाठिंब्याला व नियमित अभ्यासाला दिले आहे. त्यांची पुढील वाटचाल यशस्वी होवो, अशी सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.