आशाताई बच्छाव
बार आणि रेस्टॉरंट मध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद.आरोपीकडुन13,06,920/ रुपये किमतीची विदेशी दारू व बिअर चे बाॅक्स जप्त यासह जिल्ह्यातील 06 उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 11/12/2024
जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे येथे बार अँड रेस्टॉरंट फोडून घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. सदर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थागुशा जालना यांनी गुन्हे उघडकीस आणणे बाबत स्थागुशाचे एक विशेष तपास पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले. पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराची माहिती घेत असताना त्यांना दिनांक 10/12/ 2024 रोजी माहिती मिळाली की, मौजे घनसावंगी येथील चैतन्य बार अँड रेस्टॉरंट येथील विदेशी दारूचे बॉक्स व बियरचे बॉक्सची चोरी ही महेश राजेंद्र तवले राहणार मादळमोही तालुका गेवराई जि. बीड हमु घनसावंगी याने त्याचे साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने नमूद आरोपीचा शोध घेतला असता त्यास ताब्यात घेऊन गुन्हे संबंधाने विचारपूस करता त्याने सदर ठिकाणी त्याचे साथीदारास वेगवेगळ्या विदेशी कंपनीचे दारूचे बॉक्सची चोरी केल्याचे कबूल केले. नमूद आरोपी व त्याचा साथीदार प्रेमराज उर्फ किशोर दशरथ देवकर राहणार मादळमोही तालुका गेवराई यास ताब्यात घेऊन त्याचे कडून गुन्ह्यात चोरी केलेला वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 10, 47, 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे .तसेच नमूद आरोपीचे ताब्यातून अधिक इतर ठिकाणचा मुद्देमाल मिळाल्याने त्या अनुषंगाने मिळालेल्या माला संबंधी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची माहिती घेतली असता पोलीस ठाणे घनसावंगी येथे दोन गुन्हे नोंद आहे. नमूद आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी महेश राजेंद्र तवले यांनी त्यास काही माल हा शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान रा. घनसावंगी याने दिल्याचे निष्पन्न झाल्याने शेख. इरफान शेख. उस्मान यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने आकाशसिंग नरसिंग बाबरी व तकदीरसिंग टिटूसिंग टाक दोन्ही राहणार मंगळ बाजार जालना यांनी दोन-तीन वेळा वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स व बियरचे बॉक्स विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितले .आकाशिंग नरसिंग बाबरी व तकदीरसिंग टिटूसिंग टाक दोन्ही रा. मंगळ बाजार जालना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी पोलीस ठाणे घनसावंगी हद्दीत तीन ठिकाणी पोलीस ठाणे बदनापूर हद्दीत दोन ठिकाणी व पोलीस ठाणे परतुर हद्दीत एका ठिकाणी असे सहा ठिकाणी असलेल्या बार अँड रेस्टॉरंट ला चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारूचे बॉक्स व बीअरचे बॉक्स असा एकूण 13, 6,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार सॅम्युअल कांबळे ,रामप्रसाद पवार, लक्ष्मीकांत आडेप ,सुधीर वाघमारे, प्रशांत लोखंडे ,फुलचंद गव्हाणे प्रभाकर वाघ सागर बाविस्कर ,अक्रूर धांडगे, कैलास चेके ,धीरज भोसले, योगेश सहाने ,सोपान क्षिरसागर, भागवत खरात, सौरभ मुळे ,यांनी केली आहे.