आशाताई बच्छाव
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्काराची घोषणा..!
१०० शिक्षक क्लब च्या पुरस्काराची घोषणा.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 11/12/2024
जालना येथील १०० शिक्षक क्लब तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कारार्थी शिक्षकांची निवड करण्यासाठी निवड समितीची बैठक दि. ७ डिसेंबर रोजी स्वयंमतेज अकॅडमी,जालना येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस १००शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर,पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आर. आर. भाऊ जोशी , सदस्य श्री.पी. जी. बोराडे ,प्रा. चाटे,अशोक माधवले,विजय निकाळजे, संदीप इंगोले, श्रीमती माया कवानकर, डॉ. शिवनंदा मेहेत्रे, श्रीमती सुनीता गवई व कविता दाभाडे यांची उपस्थिती होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली.सर्वच विषयावर सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली व समिती समोर आलेली नावे, त्यांचे शैक्षणिक कार्य व विद्यार्थी गुणवत्तेसाठीचे काम याबाबींचा विचार करून महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी राज्यातील २८ पुरस्कारार्थी शिक्षकांची (यात ७ + ७ = १४ जिप व ७ + ७ = १४ संस्थेचे शिक्षक शिक्षिका) व ६ आदर्श शाळांची निवड सर्व संमतीने करण्यात आली.पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव सन्मानचिन्ह, फ्रेम केलेले प्रमाणपत्र व मानाचा फेटा देऊन केला जाणार असल्याची माहिती आर.आर. जोशी व राजेभाऊ मगर यांनी पत्रका व्दारे दिली आहे. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख, ठिकाण व प्रमुख अतिथी इत्यादी बाबींवर चर्चा झाली. अतिथींकडून होकार आल्यावर कार्यक्रम पत्रिका अंतिम केली जाईल.पण पुरस्कार वितरण सोहळा जालना येथेच रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ९.३० वाजता घेण्यात येईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळांची नावे १) श्रीमती रिया मयुरी आळवेकर, उपशिक्षक, शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नं .१ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग २) श्रीमती सविता सदाशिव आढाव,सहशिक्षिका – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभुळपाडा ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक ३) श्रीमती रोहिणी गंगाधर दांडगे, सहशिक्षिका – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बाराबंगला केंद्र – कसारा ता.शहापूर जि.ठाणे ४) श्रीमती अरुणा नामदेव पवार,सहशिक्षिका – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अंचाडे ता. जि. धुळे ५) श्रीमती रोहिणी चंद्रकांत पिंपरखेडकर, सहशिक्षिका – जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा,कुंभेफळ, ता.जि. छत्रपती संभाजीनगर ६) वर्षादेवी बाजीराव कन्नाके, सहशिक्षिका ,जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा, मेंढा (किरमिटी) ता. नागभिड जि. चंद्रपुर ७) श्रीमती सफिया अहेमद अब्दुल पटेल,सहशिक्षिका -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुपेवाडी ता. बदनापूर जि. जालना ८) श्री. सुरजलाल लिंगाराम येलमुले, प्राथमिक शिक्षक – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,छल्लेवाडा ता.अहेरी जि.गडचिरोली ९) श्री. राजेश बाबाराव इघारे, पदवीधर शिक्षक,जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मंगरली, केंद्र – लेंडेझरी ता. तुमसर जि. भंडारा १०) श्री. राजेंद्र ज्ञानदेव कडव, सहशिक्षक जिल्हा परिषद केंद्र शाळा, गंगापुर ता. भुदरगड जि. कोल्हापूर ११) श्री.राजन गौतम गरुड,प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा , बोरीचापाडा जि. पालघर १२) श्री. देवेंद्र कुमार जगन्नाथ बोरसे, सहशिक्षक , जिल्हा परिषद शाळा,सिंदीपाडा – १ , ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार १३) श्री. पद्माकर बाबुराव गोंडगे, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला, देऊळगाव गात ता. सेलू जि. परभणी १५) श्री. गोविंद नगोराव शिंदे ,मुख्याध्यापक – जेएसपीएम लातूर द्वारा संचलित,स्वामी विवेकानंद विद्यालय,कळंब रोड, लातूर जि. लातूर १६) डॉ. संदीप तात्यासाहेब माने,सहशिक्षक – मुलुंड विद्यामंदिर ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, मुलुंड जि. मुंबई १७) श्री.सुनील भाऊराव वानखडे, सहाय्यक शिक्षक – अनुसूचित जाती मुलींची शासकिय निवासी शाळा,शेळद ता. बाळापूर जि.अकोला १८) श्री. शरद नंदराम औरंगे सहशिक्षक – श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित – इंदिरा गांधी हायस्कूल, नांदेड जि. नांदेड १९) श्री. संजय पुंडलिक खंडार, सहाय्यक शिक्षक – श्री. सत्यसाई विद्यामंदिर,अंबिका नगर, नागपूर जि. नागपूर २०) श्री. दिलीप काशिनाथ पाटील, उपशिक्षक – साने गुरूजी नूतन माध्य. विद्यालय, अमळनेर जि. जळगांव २१) श्री. मिलिंद नारायणराव पंडागळे, सहशिक्षक – कै. नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय, चंदनझिरा, जि. जालना २२) श्रीमती स्वाती जितेंद्र देसाई , उपशिक्षक – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, भुईंज जि. सातारा २३) श्रीमती शोभा केशव जाधव, मुख्याध्यापिका – लोकनेते राजारामबापू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, कवठेमहांकाळ जि. सांगली २४) श्रीमती अनघा जितेंद्र सासवडकर, सहशिक्षिका – सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी, जि. अहिल्यानगर २५) श्रीमती वंदना रमेश ठाकरे , सहशिक्षिका – सेंट्रल पब्लिक स्कूल, मेहकर जि. बुलढाणा २६) श्रीमती दिपाली एकनाथराव बारगजे, सहशिक्षिका – शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंत प्राथमिक विद्यालय, बीड जि. बीड २७) श्रीमती. पोले शारदा आनंदराव, सहशिक्षिका नरहर कुरुंदकर प्राथमिक विद्यालय, कुरुंदा.जि. हिंगोली व २८) श्रीमती मंदाकिनी खलसे, सहशिक्षिका – संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, शाकुंतलनगर,जालना जि. जालना. ” राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार – १) नई तालीम व्दारा संचलित, आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम जि. वर्धा २) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थुगांव जि. नागपूर ३) शांती निकेतन विद्यामंदिर, संभाजीनगर, जालना जि. जालना
४) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , बारसवाडा ता. अबंड जि. जालना ५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,श्रीरामतांडा ता. मंठा जि. जालना ६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरा रोषणगांव ता. जि. जालना “विशेष सन्मान”- डॉ. शिवनंदा मेहेत्रे,जिप प्रशाला मुलांची,जालना, श्रीमती दिपाली अहिरे – शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक व श्रीमती दिपाली सतीश सावंत-जिप प्राथमिक शाळा,शेकापूर (बाई) जि. वर्धा यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल समुहा तर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे.