आशाताई बच्छाव
२ लाख रुपये किंमतीचे १६ मोबाईल चिखली पोलीसांकडुन हस्तगत ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वात पथकाची कामगीरी…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही काळापासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने एकूण १६ मोबाईल जप्त करून त्यांची किंमत सुमारे २ लाख २३ हजार रुपये असल्याचे आढळून आले.
ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणांवर छापे टाकून हे मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या मोबाइलमध्ये कंपन्यांचे मोबाईल समाविष्ट आहेत. पोलिसांनी जप्त केलेले हे सर्व मोबाइल त्यांचे मूळ मालक शोधून त्यांना परत केले आहेत. यामुळे चिखली परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या या
कारवाईचे कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईमागे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बि.बी.महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील, पोहेकों विजय किटे, पोकों सुनिल राजपुत, मपोकों रुपाली उगले, पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे. पोलिसांची कारवाई अशीच सुरू राहणार असून, गुन्हेगारांना शोधून कायद्याच्या कठोर प्रतारणात आणण्याचे काम पोलीस करत राहतील, असे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनी सांगितले.