आशाताई बच्छाव
तिब्बत बौद्ध धर्मीयांवर चीनचे पाबंद – साहित्यिक अमृत बनसोड
भंडारा येथे भारत तिब्बत मैत्री संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व दलाई लामा नोबेल पुरस्कार दिन कार्यक्रमात मार्गदर्शन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोज मंगळवारला सकाळी 9.30 वाजता भंडारा येथील शहरात तिब्बत स्वेटर कॅम्प येथे भारत तिब्बट मैत्री संघ शाखा भंडाराच्या वतीनेआंतरराष्ट्रीय मानवाधिकार व दलाई लामा नोबेल पुरस्कार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष महादेव मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारत तिबेट मैत्री संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व छत्तीसगड राज्याचे प्रभारी अमृत बनसोड, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, माजी प्राचार्य अनमोल देशपांडे , सामाजिक कार्यकर्ते रोशन जांभुळकर ,एम डब्लू मोरे ,बी एफ कोचे, धनंजय तिरपुडे ,समतेल लोभसांग ,नरोबो डोलमा, ग्यानलाल पालझुम, निम्म्या ,प्राध्यापक रमेश जांगडे ,सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,पत्रकार शशिकांत भोयर उपस्थित होते . यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश भारत तिब्बट मैत्री संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व छत्तीसगड राज्याचे प्रभारी अमृत बनसोड म्हणाले की,आपण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करतो, परंतु आज शोकांतिक आहे की ,चीन कडून तिब्बटी बौद्ध धर्मियांवर आजही मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे. त्यांना स्वतंत्र नागरिक म्हणून जगता येत नाही .त्यांच्यावर अनेक बंधने लादण्यात आलेली आहेत . अशा पद्धतीची शोकांतिका यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.