आशाताई बच्छाव
हिंगोली जिल्हाभरात पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेतकरी गोरगरीब लाभार्थी यांच्याकडून आर्थिक लूट
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली जिल्हा भरात हिंगोली .सेनगाव. औंढा नागनाथ कळमनुरी .वसमत. आधी पंचायत समिती अंतर्गत विधानसभेची आचारसंहिता संपल्यानंतर कामकाजाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे गत दोन महिन्यापासून जिल्हाभरातील पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग इतर कार्यालयाच्या ठिकाणची कामे आचारसंहितेमुळे थांबवण्यात आली होती विधानसभेचा निवडणूक निकालानंतर आचारसहिता क्षितिज झाल्याने आता संबंधित ऑफिस मधील कामकाजाला वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पंचायत समिती ही ग्रामीण भागातील सर्वच नागरिकाशी कुठे ना कुठे निगडित असते आता सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी प्रधानमंत्री घरकुल योजना रमाई घरकुल योजना शबरी गायगोठे मनेरेगा अंतर्गत येणाऱ्या अनेक कामकाजाला गती मिळाल्याने लाभार्थ्यातून समाधान व्यक्त होत असतानाच संबंधित कामकाजासाठी लाभार्थ्याकडून मोठी आर्थिक लूट होत असल्याचे लाभार्थ्यातून बोलल्या जात आहे त्यामुळे सदरील बाप गेल्या चार दिवसापासून अधिक जिल्हाभरात तीव्र होताना दिसत आहे याच बाबीची दखल रिपब्लिकन युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या कानावर गेल्यानंतर जिल्हाभरातील पाचही पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेला गैरप्रकार न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा किरण घोंगडे यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे संबंधित पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल सिंचनियर गोठा आधी संबंधित कारभाराविषयी लाभार्थ्याकून नाराजी व्यक्त होत आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे बोलल्या जात आहे संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधीने संबंधित बाबीची स्वतः जातीने चौकशी करून लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी जनतेतून व लाभार्थी वर्गातून होत आहे.