आशाताई बच्छाव
धर्मेंद्र कोचे “प्राईड ऑफ भारत” पुरस्काराने सन्मानित.
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा परिषद हायस्कूल साकोलीचे मुख्याध्यापक धर्मेंद्र लक्ष्मणराव कोचे यांना आय कॅन फाउंडेशन जयपुर राजस्थान यांचे द्वारा “प्राईड ऑफ भारत “पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्या जाणारे आपल्या क्षेत्रात प्रशासनाद्वारे उत्कृष्ट कार्य करण्यासाठी दरवर्षी प्राइड ऑफ भारत पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथील मुख्याध्यापक धर्मेंद्र लक्ष्मणराव कोचे यांना प्रदान करण्यात आला.
प्राइड ऑफ भारत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सभापती समाज कल्याण जि प मदन रामटेके, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, विस्तार अधिकारी हरीश भलावी, जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा १ चे मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, हुसेन बडोले, चंद्रकांत वडीचार, पुष्पा कापगते, सुनील रोकडे यांनी केले. शाळेच्या वतीने सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून सर्वांनी अभिनंदन केले. याप्रसंगी बी. आर. चव्हाण, प्रतिभा पडोळे, आशा चौधरी, एम.बी भैसारे, डी. डी. मसराम, मुकेश गुरनुले, अमित डोये, तोफिक सय्यद, लीना हूमने, सुशांत बांडेबुचे, गिरीश सोनवणे, प्रयाग बोरकर, एस मरसकोल्हे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.