आशाताई बच्छाव
अंत्री खेडेकर येथील विद्यार्थिनीचा सिकंदराबाद येथे मृत्यू!परीक्षेसाठी गेली होती सिंकदराबादला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील वैष्णवी राजू खेडेकर ही विद्यार्थीथिनी १३ नोव्हेंबर रोजी सिकंदराबाद येथे रेल्वे विभागाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा पेपर देऊन रेल्वेने परत निघालेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि. 02 डिसेंबर रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. वैष्णवी राजू खेडेकर असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी राजू तेजराव खेडेकर यांची मुलगी वैष्णवी राजू खेडेकर (२० वर्ष) ही १३ नोव्हेंबर रोजी सिकंदराबाद येथे रेल्वे विभागाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेली होती. पेपर संपल्यानंतर घराकडे परतण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनमध्ये आली असता रात्री ९ वाजताच्या सुमारास रेल्वे अपघातात तिचा मृत्यू झाला. या घटनेने अंत्री खेडेकर गावावर शोककळा पसरली आहे.