Home बुलढाणा शाब्बास ! ‘जंग जारी रहेगी!’ मर्दानीचे विशेष कौतुक ! उद्धव ठाकरे म्हणालेत...

शाब्बास ! ‘जंग जारी रहेगी!’ मर्दानीचे विशेष कौतुक ! उद्धव ठाकरे म्हणालेत खूप जिद्दीने लढलात !

37
0

आशाताई बच्छाव

1000998744.jpg

शाब्बास ! ‘जंग जारी रहेगी!’ मर्दानीचे विशेष कौतुक ! उद्धव ठाकरे म्हणालेत खूप जिद्दीने लढलात !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा केवळ 841 मतांनी निसटता पराभव झाला असला तरी, महाविकास आघाडीच्या उबाठाच्या मशाल चिन्हावर लढलेल्या जयश्री शेळके यांनी ‘यापुढेही लढाई सुरू राहण्याचा प्रण घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा यांनी निकराच्या लढाईत झुंज देणाऱ्या या मर्दानीचे विशेष कौतुक केले. शाब्बास म्हणून पाठीवर थाप दिली. त्यामुळे पुढे लढाई सुरूच राहणार असे जयश्रीताई शेळके यांनी ग्वाही दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी संघर्षमय लढतीत शेळके यांचा अखेरच्या 3 फेऱ्यांमध्ये

निसटता पराभव झाल्यानंतर फेसबुकवर

‘विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.. पेटेन उद्या नव्याने, हे

सामर्थ्य नाशवंत नाही’ ही कविता

पोस्ट केली होती. दरम्यान ‘खूप लढी मर्दानी’ अशा भावना सर्वत्र उमटत होत्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जयश्री ताईंचे तोंड भरून कौतुक केले. पाठीवर थाप देऊन पुन्हा लढ असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here