आशाताई बच्छाव
BREAKING – आमदार संजय गायकवाड यांची ‘मन की बात!’ निसटता पराभव झाल्याने केंद्रीय मंत्री जाधवांवर व आ.डॉ. कुटेंवर नाखुश ! -एकही पक्षाची साथ नाही; ज्वेलसी निर्माण झाली की काय?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा एका कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनी आपली ‘मन की बात’ जाहीर करून टाकली. ते बिनधास्त म्हणाले की, शिंदे सेनेचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी मला साथ दिली नाही. माझ्या विकासकामांनी मला ८४१ मतांनी विजय मिळाला. परंतु हा निसटता विजय असून, लोकांना विकास कामे हवीत की नाही ?
असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. निवडणूक मी एकट्याच्या बळावर लढलो ! अपेक्षित मते पडू शकली नाहीत मात्र हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे. परंतु हा विजय निसटता होता त्यामुळे ते म्हणाले की, ‘अपेक्षित मते पडू शकली नाहीत पण हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित आहे.’ दरम्यान काही मित्र पक्षांनी साथ दिली नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. मी जनतेच्या सेवेसाठी संघर्ष करत आहो. लोकांसाठी झटत असतांना व प्रचंड विकास कामे केली असताना
अपेक्षीत
मते पडू शकली नाही. लोकांना नेमकं काय हवं? हा यामुळे प्रश्न पडतो. तरी सुध्दा 91 हजारावर मतदारांनी आपल्याला पसंती दर्शवली. त्याबद्दल मतदारांचा मी ऋणी आहे. ही निवडणूक मी एकट्याच्या बळावर लढलो. परंतु आमचेच सहकारी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आणि भाजपाचे माजी मंत्री तथा आ. संजय कुटे यांनी कुठलीच मदत केली नाही, त्यांना माझ्याबद्दल ज्वेलेसी निर्माण झाली की काय? असे आमदार संजय गायकवाड नाराजीने म्हणाले.
संजूभाऊ के ‘मन की बात’ पहा!