आशाताई बच्छाव
अमडापुर येथे गोवंशाची कत्तल करुन मांसाची विक्री करणा-या इसमांवर गुन्हा दाखल…….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली तालुक्यातील अमडापुर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की. मोती चौक, अमडापुर येथे काही इसम हे गोवंश गाय/बैल यांची अवैध कत्तल करून त्याचे मांस विक्री करीत आहेत. अशा माहिती वरून दिनांक
27/11/2024 रोजी 08.00 वाजता मोती चौक, अमडापुर येथे जावून पाहणी केली असता, काही इसम हे गोवंश जातीचे गाय/बैलाचे मांस त्यांचे ताब्यात ठेवुन मोती चौक, अमडापुर येथे सार्वजनीक ठिकाणी आमरस्त्यावर विक्री करण्याकरीता बसलेले पंचासमक्ष दिसले, वरून पोलीसांची व पंचाची खात्रा झाल्याने पोलीसांनी पंचासमक्ष सदर इसमांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांची नांवे (01) शेख मुस्ताक शेख नन्नु, वय 40 वर्ष, 02) शेख सलीम शेख नन्नु, वय 55 वर्षे, 03) शेख फत्तु शेख अबील, वय 50 वर्ष, (04) शेख चुढन शेख कादर, वय 50 वर्षे, 05) सै. नदीम सै. हसन, वय 25 वर्षे, 06) से नसीम से हसन, वय 20 वर्ष, सर्व राहणार मोती चौक, अमडापुर असे असल्याचे सांगीतले. त्यांना त्याचे ताब्यातील गोवंश मासांबाबत विचारपुस केला असता, त्यांनी एकत्रित मिळुन गोवंश जातीचे एक जनावर कत्तल करून, त्याची चिल्लर विक्रीकरीता सर्वांनी वाटुन घेवून विक्रोकरीता समोर ठेवुन बसलेलो होतो असे पंचासमक्ष त्यांनी सांगीतले. वर नमुद आरोपीतांच्या ताब्यात विक्रीसाठी ठेवलेले गोवंश जातीचे 210 किलो मांस किमी 31500/-रुपये तसेच मांस कापण्याचे सत्तुर,, मांस कापण्याकरीता वापरात असलेले एक लाकडी ठोकळे, वजन काटा, वजन मापे किंमती अंदाजे 4200/- रुपये असा एकुण 35700 रुचा मुददेमाल मिळुन आला. सदर आरोपीतांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गोवंशची हत्या करून अवैधरित्या विक्री करण्याकरीता सार्वजनीक ठिकाणी आम रस्त्यावर मिळून आलेले असल्याने, त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन अमडापुर येथे गुन्हा रजीष्टर क्रमांक- 0398//2024 कलम 5, 5(ब), 5(क), 9, 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 2015 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक फाजदार निवृत्ती चेके करीत आहेत. सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक साहेब , मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार निखिल निर्मळ, सफौ निवृत्ती चेके, सफौ अच्युतराव सिरसाठ, पोहवा भगवान शैवाळे, पोकों अमोल काकडे, रणजीत सरोदे यांनी कार्यवाही केली आहे