Home जालना घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा

घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा

22
0

आशाताई बच्छाव

1000816279.jpg

घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा
– जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे आवाहन
बदनापूर मतदार संघातील पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न
जालना, दि. ५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- आगामी निवडणुकीत उमेदवार कोणीही असो. परंतु
आजच्या घडीला आपला उमेदवार केवळ मशाल आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
धनुष्यबाण विरोधकांनी चोरला. पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर हे चिन्ह
सर्वच नागरिकांना माहीत नसल्यामुळे आपल्या मतावर परिणाम झाला. तर आमचे
धनुष्यबाण हे चिन्ह समजून नागरिकांनी मतदान केल्याने विरोधकांना त्याचा
फायदा झाला. त्यामुळे आता मशाल चिन्ह हे प्रत्येक मतदारापर्यंत जाणे
आवश्यक आहे. आज रोजी आपला उमेदवार ठरलेला नाही परंतु आपले चिन्ह मशाल हे
समजून प्रत्येकाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर
अंबेकर यांनी केले.
बदनापूर मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची महत्वाची बैठक शिवसेना भवन येथे
शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभाग प्रमुख, तालुकाप्रमुख,
उपतालुकाप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी
व्यासपीठावर माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हासंघटक भानुदास घुगे,
तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, तालुकाप्रमुख अशोकबर्डे, कैलास चव्हाण,
बाबुराव पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना
जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की,
पुढे बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, पक्ष प्रमुख
उद्धवजी ठाकरे हे मागील अनेक वर्षांपासून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत
आहेत. पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह गेले तरी त्यांनी हिम्मत न हारता नव्या
जोमाने पक्ष बांधणी केली पक्ष उभा केला. सोयाबीन, कपाशी यासह
शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, सामान्य नागरिकांना न्याय
मिळावा .

Previous articleसोयाबीनच्या गंजीला खोडसाळपणाने आग लावल्याने तीन लाखाचे नुकसान 
Next articleकाँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here