Home जालना सोयाबीनच्या गंजीला खोडसाळपणाने आग लावल्याने तीन लाखाचे नुकसान 

सोयाबीनच्या गंजीला खोडसाळपणाने आग लावल्याने तीन लाखाचे नुकसान 

26
0

आशाताई बच्छाव

1000816274.jpg

सोयाबीनच्या गंजीला खोडसाळपणाने आग लावल्याने तीन लाखाचे नुकसान
=========
सोमनाथ जळगाव येथील घटना; गुन्हा दाखल 
===========
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे- जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे कोंडीराम गंगाधर निकम यांनी काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीला कुणीतरी खोडसाळपणाने आग लावून सुमारे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान केल्याची घटना आज शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून, याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमनाथ जळगाव येथील कोंडीराम गंगाधर निकम यांनी श्री विठ्ठल संस्थान जळगांव यांचा गट क्रं. 118 मधील 12 हेक्टर शेत जमीनपैकी सात एक्कर शेती माझ्याकडे मागील सात वर्षापासुन सुमारे सहा हजार रुपयेप्रमाणे ठोक्याने घेतलेली आहे, यावर्षी त्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती व दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत पुर्ण पाच एक्कर सोयाबीनची काढणी केली व गंजी लावुन ताडपत्रीने झाकून ठेवली होती. आज शनिवारी सकाळी 6 वाजता ते आणि त्यांच्या घरातील सदस्य शेतातमध्ये थोडी राहीलेली सोयाबीन काढणी करण्यासाठी गेले असता, झाकुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागलेली दिसली. सर्व सोयाबीन जळून राख झाल्याचे बघून त्यांना धक्काच बसला. शेताशेजारी असणारे तुकाराम आप्पासाहेब निकम यांना व इतर गावातील लोकांना विचारपुस केली असता त्याबाबत कोनाला काहीएक माहीती नसल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने सोयाबीनच्या गंजीला आग लावून चाळीस ते पन्नास क्वींटल सोयाबीन सोयाबीनचे म्हणजेच अडीच ते तीन लाखाचे नुकसान केल्याची तक्रार कोंडीराम निकम यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात दिल्यावरून  अज्ञात व्यक्तीविरुद्ध बालवी कलम 326 (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्या

Previous articleकेंद्र प्रमुख आप्पाने सर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Next articleघर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here