Home विदर्भ वसमत विधानसभा मतदार संघात निवडणुकी पूर्वीच आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत दमदाटि सुरू असल्याचे...

वसमत विधानसभा मतदार संघात निवडणुकी पूर्वीच आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत दमदाटि सुरू असल्याचे चित्र

34
0

आशाताई बच्छाव

1000816253.jpg

वसमत विधानसभा मतदार संघात निवडणुकी पूर्वीच आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत दमदाटि सुरू असल्याचे चित्र
हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघ मोठा मतदारसंघ म्हणुन ओळख आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पादन देणारा म्हणून वसमत चार तालुक्याचा नंबर लागतो यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण वसमत व औंढा नागनाथ या तालुक्यातील मतदार संघाची यांनी आहे वसमत मतदारसंघात एकुनच तीन साखर कारखाने आहेत पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत त्याचबरोबर टोकाई सहकारी साखर कारखाना कुरूदा वसमत कपिलेश्वर सहकारी साखर कारखाना जवळा बाजार हे तीन्ही साखर कारखाने वसमत विधानसभा सभा मतदारसंघात आहेत यामुळे या मतदारसंघात मोठी आर्थिक उलाढाल होत असते हे मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा व या मतदारसंघावर आपलं वर्चस्व असावे या उद्देशाने गेल्या सहा महिन्यापासून मतदार संघातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस वेगळे वळण घेताना पाहायला मिळत आहे मतदार संघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराकडून आरोप प्रत्यारोपाच्या शाब्दिक फायरिंग मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांवर सुरू असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराकडून निवडणूक अर्ज प्रक्रियापूर्वीच टोकाची भूमिका घेऊन उमेदवारांनी आपली भाषणे सुरू असतानाच आरोप केल्याचे दिसत आहे.
मतदारसंघातील मतदारांमध्ये गेल्या काहि दिवसात बदल पाहायला मिळत आहे एकंदरीत मागील पाच वर्षातील ट्रेमचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर जयप्रकाश जी मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गट या ठिकाणी पक्ष प्रवेश केल्याने मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाट्यमय वातावरण सुरू झाल्याचे चित्र आहे .त्यातच मागील अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये दोन जप्रकाश मधील राजकारण हे कुठेतरी मतदारसंघात जुळते मिळते असल्याचे पाहायला मिळत होते दोन्ही जप्रकाश मुंदडा व जयप्रकाश दांडेगावकर यांनी कधीकाळी आपल्या सोयीचे राजकारण तर केले तर कधी एकमेकातील बेरजेचे राजकारण जरी करत असले तरी शेवटी मतदारसंघातील खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळत होते पण आज एकाच राजकीय पक्षातील व्यासपीठावर वाढलेले माजी आ.दांडेगावकर व विद्यमान आ.नवघरे यांचे आजचे गुरुविरुद्ध शिष्य अशी आतापर्यंतची राजकीय वाटचाल होती पण मागील काही दिवसांपासात विद्यमान आ.नवघरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आजीत पवार गटात गेल्याने दोघांमधील जवळीकता कमी व राजकीय वातावरण थोडे बदलत असताना दिसुन आले माजी सहकार मंत्री जप्रकाश दांडेगावकर हे शरदचंद्र पवार यांच्या जवळीक मानले जाते व आजपर्यंत अनेक काळ त्यांच्यासोबत उजव्या हात म्हणून काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत भैय्या नवघरे यांच्यात मात्र गेल्या सहा महिन्यापासून वैचारिक पातळीवर एकमेका विरोधात तोफा कडाडताना पाहायला मिळत आहे यातच मागील महिन्यात पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सरते शेवटी वेगळेच वळण दोघांच्या राजकीय परिस्थितीने पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व कर्मचाऱ्यांनी पाहिले व ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जिल्हाभरात ते वसमत विधानसभा मतदार संघात पसरले पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या मध्यमातून उभारण्यात येणार्या नवीन प्रकल्पावरून सुरू झालेल्या वादाची ठिणगी विद्यमान आमदार व माजी मंत्री दांडेकर यांच्यात पडली व त्यावरून शेवट राष्ट्रगीतापर्यंत गेला व शेवटी कार्यक्रम राष्ट्रगीतानेच राजकीय रूप धारण करून मतदार संघात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सभा कोपरा बैठका मतदारसंघातील गाठी भेटि व मेळावे यामधून मतदार संघातील राजकीय कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्यासाठी व्यासपीठावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप भाषणातून वेगळीच वळण सुरू झाली आहे त्यामुळे मतदारसंघातील अनेक मतदारांना व कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वसमत विधानसभा मतदार संघातील राजकीय खेळी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे मागील काळातील राजकीय पक्षातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या विरूद्ध विचारांची दोन्ही पक्ष असताना या दोन्ही राजकीय पक्षातील वैचारिक मतभेद होते पन राजकीय मतभैद म्हणुन या दोन्ही उमेदवारातून कधी न होणाऱ्या शब्द उपचार आज पाहायला मिळत आहे शिवसेना पक्ष जरी आक्रमक भुमिका घेणारा असला तरी मतदारसंघातील या दोन्ही राजकारणी माजी आमदार अनेक काळ एकत्र येऊन मतदारसंघातील वातावरण व विकासाची बाजु ठेवत राजकारण केले .
पन आज घडीला राजकीय पक्षातील भावी उमेदवारी व मतदार संघात आमदार आपलनच असावा म्हणून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप यांनी मात्र टोकाची भूमिका घेतल्याचे चित्र आज घडीला वसमत विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर व आचारसंहिता सुरू झाल्या नंतर यांच्या मध्ये बदल होईल का असाही प्रश्न आता मतदारसंघातील मतदारांमध्ये बोलल्या जात आहे.
टोकाची भुमिका घेवुन दमदाटि सारखे प्रकार होताना एकाच व्यासपीठावर वाढलेल्या लोकपतीनीधी मधुन आरोपांची एकमेकांवर असलेली शाब्दिक फाररीग सुरू आहे.
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली

Previous article_जिल्ह्यातील ओबीसींना न्याय मिळवून द्या_ _महामहीम राज्यपाल यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे साकडे_
Next articleकेंद्र प्रमुख आप्पाने सर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here