आशाताई बच्छाव
पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष कारावास बुलढाणा न्यायालयाचा निकाल
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो ची फ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बुलढाणा न्यायालयाने एकास पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ३ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. बुलढाणा पोलिस ठाण्यांतर्गत
१७ जुलै २०१९ मध्ये ही घटना घडली होती.
पिडीत अल्पवयीन मुलीचे वय १० वर्षे ९ महिन्यांची होती. घटनेच्या दिवशी रात्री ८ वाजता वडिलांच्या रूम मध्ये
पीडित मुलगी ही लॅपटॉप पाहता पाहता झोपी गेली. मात्र तिला अयोग्य पद्धतीने पित्याकडून स्पर्श झाल्यामुळे ती जागी झाली तिची आई बाहेरगावी जॉबसाठी असल्याने पीडित मुलीने ही बाब तिच्या काकूस सांगितली. पीडितेची आई आल्यानंतर तिलाही ही माहिती देण्यात आली. परंतु बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण घरात दांबल परंतु आरोपीचे हे प्रकार वाढतच गेले. त्यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेच्या आईने याप्रकरणी बुलढाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये तसचे पोक्सो अॅक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सुनावणीदरम्यान जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत एल. भटकर यांच्याकडून एकूण सात साक्षीदार
तपासण्यात आले. त्यात पीडितेची आई, काकू, पीडिता, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी आरोपीस जास्तीत
जास्त शिक्षा व्हावी, अशा दृष्टीने अॅड. भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकूण न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपीस पोक्सो आणि कलम ३५४ मध्ये दोषी धरून पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास चार महिने साधी कैद अशी तरतूदही निकालात करण्यात आली आहे.