Home नांदेड माहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर

माहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर

26
0

आशाताई बच्छाव

1000792202.jpg

माहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर

जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. २७ सप्टेंबर – मा‍हितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्‍त अर्जांची कार्यवाही तत्‍परतेने करणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा अभ्‍यासक अभिवक्‍ता डॉ. भीमराव हाटकर यांनी केले.

आंतरराष्‍ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्‍त जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात ते बोलत होते. माहिती अधिकार कायद्याबाबत सर्वसामान्‍य नागरीकांत जाणीव जागृती होण्‍यासाठी प्रशासकिय पातळीवर दरवर्षी २८ सप्‍टेबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करुन माहितीचा अधिकार दिन साजरा करण्‍यात येतो. यावर्षी दिनांक २८ रोजी शासकिय सुट्टी असल्‍याने शासन निर्देशानुसार शुक्रवार दिनांक २७ रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकारी दिन साजरा करण्‍यात आला. जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबरला कार्यालयामध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे.

पुढे बोलताना माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, वेळोवळी झालेले बदल, बदलाच्‍या अनुषंगाने समाजमन व प्रशासकिय घटकांच्‍या मानसिकतेतील बदल अधोरेखीत केला. माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.त्‍यामुळे अधिकारी कर्मचारी यांनी माहितीचा अधिकार अर्जांची हाताळणी संवेदनशीलता व कर्तव्‍यभावनेने करावी असे आवाहन हाटकर यांनी केले.

व्‍याख्‍यानानंंतर कर्मचा-यांच्‍या शंकाचे निरसन करण्‍यात आले. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर ,उपजिल्‍हाधिकारी अजय शिंदे, तहसिलदार विपीन पाटील, विकास बिरादार नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, जया अन्‍नमवार, नयना कुलकर्णी, यांचे सह अधिकारी कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Previous articleसोनई महाविद्यालयातील प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान…
Next articleजाफाबाद भागातील जनतेने घेतली चोरांची धास्ती अशोक पाबळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here