आशाताई बच्छाव
माऊंटआबु येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाकरिता कारंजा येथील पत्रकार बांधव रवाना
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- राजस्थान राज्यातील माऊंट आबु येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी मिडीया विंगच्या वतीने २६ ते ३० सप्टेंबरपर्यत आयोजित केलेले पत्रकारांचे राष्ट्रीय महासंमेलन तथा सहविचार परिसंवादाकरीता कारंजा येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय कारंजाच्या संचालिका ब्रम्हकुमारी मालतीदीदी यांच्या मार्गदर्शनात कारंजातील पत्रकार बांधव मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी रवाना झाले.
स्वस्थ आणि सुखी समाजाच्या आध्यात्मिक सशक्तीकरणासाठी ब्रम्हाकुमारीज या सेवाभावी संस्थेच्या वतीने माऊंट आबू येथील आनंदसरोवर येथे दरवर्षी देशभरातील पत्रकारांसाठी मोफत राष्ट्रीय महासंमेलन घेण्यात येते. या पत्रकार महासंमेलनाला विद्यमान राष्ट्रपती ब्र.कु.द्रोपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाला संपूर्ण भारत देशामधून हजारो पत्रकार, संपादक, प्रकाशक, रेडीओ, दुरदर्शन, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया संवाददाता सहभागी झाले आहेत. या संमेलनाकरीता जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक अशोकराव उपाध्ये गुरुजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार संजय कडोळे, पत्रकार लोमेश चौधरी, विजय खंडार, सुधाकर इंगोले, गजानन हरणे, संजय गावंडे, शंकरराव पुंड आदी पत्रकार बांधव रवाना झाले आहेत. या सर्व पत्रकारांना प्रदिप वानखडे, गोलू लाहे, नकुल उपाध्ये, योगेश उपाध्ये, दुष्यंत चौधरी आदींनी बडनेरा रेल्वे स्थानकावर त्यांना शुभेच्छा दिल्या.