आशाताई बच्छाव
जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, आधार बहूउद्देशिय संस्था व रासेयोचा संयुक्त उपक्रम
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ– रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हा उद्देश समोर ठेवून आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था झाकलवाडी, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ सप्टेंबर रोजी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजीत रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व झाकलवाडी येथील युवकांनी सहभाग घेवून उस्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिरामध्ये महादेव काळबांडे, शुभम उबाळे, जाबीर शेख, देव डोंगरदिवे, सय्यद आयान, राहुल डोंगरदिवे, सय्यद नूर, विशाल कव्हर, गजानन खरात आदींनी रक्तदान करून समाजाला रक्तदानाचे महत्त्व समजावे व गरजेच्या वेळी ते उपयोगी यावे यासाठी रक्तदान करणे आवश्यक असून सर्वांनी रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ दान करावे असा संदेश दिला. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी प्रा. डॉ. मनीषा कीर्तने व प्रा. डॉ. रवींद्र पवार तसेच आधार संस्थेचे पदाधिकारी सय्यद युनूस, सय्यद नूर, विशाल कव्हर, अनंत ढोले, श्रावणी राजणकर, शामल राजणकर, सिमा शृंगारे, शितल बुरके, दिक्षा तायडे, कार्तिका जामकर, जयश्री भडांगे उपस्थित होते. रक्त संकलनासाठी रक्तदान विभागामधील डॉ. स्नेहा भोबळे, डॉ. मुंडे, आशिष इंगळे, गणेश वैद्य व इतर कर्मचार्यांनी सहकार्य केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.