Home बुलढाणा बहीण भावाचा मृत्यू ; ९ जणांना अन्नांतून झाली विषबाधा !

बहीण भावाचा मृत्यू ; ९ जणांना अन्नांतून झाली विषबाधा !

36
0

आशाताई बच्छाव

1000783792.jpg

बहीण भावाचा मृत्यू ; ९ जणांना अन्नांतून झाली विषबाधा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- नांदुरा तालुक्यातील दुधलगाव गावची घटना बहीण भावाचा मृत्यू ; ९ जणांना अन्नांतून झाली विषबाधा ! पिमपळगाव काळे येथून जवळ असलेल्या दादुलगाव येथील शेतातील विट्टभट्टयावर असलेल्या आदीवासी कुटुंबांमधील ९ जणांना अन्नातून विषबाधा झाली. यामधील बहीण-भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६ जणांवर अकोला येथील जीएमसीमध्ये तर एका मुलीवर जळगावात उपचार सुरु जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव गावाशेजारी असलेल्या शिवचरण घ्यार यांच्या शेतात वीटभट्टा फॅक्टरीत वेगवेगळ्या भागातील नातेवाईक असलेले ३ ते ४ आदिवासी कुटुंब काम करत असून शेतातच वास्तव्याला आहे
२२ सप्टेंबरच्या रात्री ९ जणांना विषबाधा झाली. सदर घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वलाताई पाटील सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखलझाल्या. त्यांचेसमवेत जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद जाधव, डॉ. काळे, डॉ. थिगळे, डॉ. रुपाली घोलप यांनी प्राथमिक उपचार करीत विषबाधा झालेल्यांना आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेने खामगाव येथे नेले. रोशनी सुनील पावरा वय २ वर्ष व अर्जुन सुनील पावरा ६ वर्ष या बहिण भावांचा खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर ६ जणांना ‘अकोला’ येथे रेफर करून जीएमसीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
तर कु. आरती विलास सोळंके हिच्यावर आसलगाव येथे प्राथमिक उपचार करून जळगाव येथील डॉ. संदीप वाकेकर यांच्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे डॉ. वाकेकर यांनी सांगितले. बहिण भावांचे शववाविच्छेदन करून आई- वडिलांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. त्यानंतर त्यांचेवर आसलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यातील ६ जणांवर अकोला येथे उपचार सुरू असून एकाची तब्येत गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावर आरोग्य विभागाची टिम गेली असता खाद्य पदार्थावर बुरशी आलेले अन्न सेवन केल्याने विषबाधा झाल्याचे समजते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर विषबाधा झाल्याचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Previous articleजिल्ह्यात पावसाचा ऐलो अलर्ट, बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट,व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता….
Next articleटाकळीभान येथे सफाई कामगारांना साहित्य वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here