Home गडचिरोली महिलांचे सक्षमीकरण हेच सरकारचं ध्येय.. _भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रतिपादन_

महिलांचे सक्षमीकरण हेच सरकारचं ध्येय.. _भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रतिपादन_

13
0

आशाताई बच्छाव

1000765748.jpg

महिलांचे सक्षमीकरण हेच सरकारचं ध्येय..
_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रतिपादन_

मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उर्फ देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींचा / मातृशक्तीचा / नारीशक्तीचा भव्य महिला मेळावा चामोर्शी येथे संपन्न.

चामोर्शी/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रतिपाद_:- मातृशक्तीचा, नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजपा महिला मोर्चा व भाजपा तालुका चामोर्शी च्या वतीने आयोजित भव्य महिला मेळावा बालाजी सभागृह येथे संपन्न झाला.

महिला मेळाव्याला संबोधित करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे म्हणाले, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच लखपती दीदी व बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे हेच राज्य सरकारचे ध्येय आहे. महिलांच्या आर्थिक सक्षणीकरणातूनच देशाचा व राज्याचा विकास घडतोय असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.

पुढे बोलताना सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी १५ ऑगस्ट २०२३ ला लाल किल्ल्यावरून लखपती दीदी या योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करिता बिनव्याजी १ ते ५ लाख पर्यंत कर्ज देण्यात येत असून महाराष्ट्र मध्ये देखील राज्य सरकारने २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेत. त्यापैकी १३ लाख बनवण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने लखपती दीदीचे उद्दिष्ट १ कोटी वरून ३ कोटी केले. सोबतच राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अशी महत्वकांशी योजना आणून या योजनेच्या माध्यमातून महिलांकरिता वार्षिक तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सोबतच मुलींकरिता मोफत शिक्षण याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली. मागील अडीच वर्षापासून राज्य सरकारचे ध्येय महिलांना सक्षमीकरण करण्याचेच असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा काँग्रेस द्वारे पसरविण्यात येत आहे. परंतु ही योजना राज्य सरकार बंद करणार नाही. परंतु महाविकास आघाडी सत्तेत आल्यास योजना बंद करेल व याबाबतचे वक्तव्य काँग्रेसचे नेते देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देवा भाऊला निवडून आणून महायुतीला सत्तेत आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व माता भगिनींची आहे. व आपण पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत बसवणार असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर प्रामुख्याने या मेळाव्याचे उद्‌घाटक- मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते खासदार मंडला लोकसभा क्षेत्र, अध्यक्ष संसदीय अनु.जाती,जनजाती समिती भारत सरकार तथा गडचिरोली/चंदपूर प्रवासी प्रभारी,मेळाव्याचे अध्यक्ष श्री. अशोकजी नेते माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा, तसेच संयोजक गडचिरोली – चंदपूर लोकसभा, माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चा अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी,महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,माजी आमदार डॅा. नामदेवराव उसेंडी,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.गिताताई हिंगे,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी चे जिल्हा प्रभारी डॅा.मिलिंदजी नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,भाजपा तालुकाध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर,नगरसेवक तथा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,जेष्ठ नेते नामदेवराव सोनटक्के, तालुकाध्यक्षा अनिता राँय, कार्यक्रमाचे संचालन तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, नगरसेविका सोनाली ताई पिपरे,जिल्हा सचिव वर्षा ताई शेडमाके,प्रतिमा सरकार,जेष्ठ नेत्या आकुली बिशवास, संगिता भोयर, जिल्हा महामंत्री सिमा कन्नमवार,पुष्पाताई करकाडे, तसेच मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.यावेळी मोठया संख्येने महिला भगिनीं व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती दया ; खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
Next articleमुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विध्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here