Home गडचिरोली जिल्हा प्रेक्षगार मैदान येथे धावपट्टी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशिक्षण घेणार्या विध्यार्थ्यांना करिता...

जिल्हा प्रेक्षगार मैदान येथे धावपट्टी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशिक्षण घेणार्या विध्यार्थ्यांना करिता मैदान स्वच्छ करून द्यावे. – डॉ. मिलिंद नरोटे

12
0

आशाताई बच्छाव

1000765742.jpg

जिल्हा प्रेक्षगार मैदान येथे धावपट्टी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशिक्षण घेणार्या विध्यार्थ्यांना करिता मैदान स्वच्छ करून द्यावे. – डॉ. मिलिंद नर

क्रीडा संकुल गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली शहर जिल्हा मुख्यालयी एकमात्र उपलब्ध असलेल्या जिल्हा प्रेक्षगार मैदान ज्यात बांधकाम सुरू आहे, सध्या गडचिरोली मध्ये पोलीस भरती प्रशिक्षण करिता वेगवेगळ्या गावामधून मुले आलेले आहेत त्यामुळे त्यांची संख्या खूप आहे. सोबतच दुसरे खेळ खेळणारे आणि गावातील नागरिकांकारिता सुद्धा एकच मैदान आहे. त्यात ४०० मिटर धावपट्टी अपुऱ्या स्वरूपात आहे. वर्षभर पोलीस भरती प्रशिक्षणाकरिता प्रतिदिन ५०० ते ६०० विध्यार्थी विविध अँकडमिच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत असतात, व या मैदानात बांधकामाचे साहित्य असल्यामुळे तेथील घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव करण्यास त्रास होत आहे. बांधकाम साहित्य पडून असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना इजा होऊ शकतात ते टाळण्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात मैदान दुरूस्ती करून विध्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी या करिता मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्कर घटाले गडचिरोली यांना निवेदन दिले.
सोबतच जिल्हा प्रक्षेगार मैदानात जाऊन डॉ. मिलिंद नरोटे यांनी तेथील विद्यार्थ्यांशीं खेळाडूंची संवाद साधला व तेथील समस्या जाणून घेतल्या. पाण्याची सोय आणि सार्वजनिक शौचालयाकरिता पाठपुरवठा करू असे आश्वासन दिले.
यावेळी प्रामुख्याने युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा संचालक युवागर्जना फाउंडेशन श्री. अनिलजी तिडके, गुरुकुल करिअर अकॅडमी संचालक पुष्कर सेलोकार, पोलीस प्रशिक्षण अकॅडमी गडचिरोली संचालक निखिल वाकडे, विरंगण करीअर अकॅडमी संचालक डेनी मेश्राम व सहकारी उपस्थित होते.

Previous articleजनतेने विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा आमदार डॉक्टर देवराव होळी
Next articleभेंडाळा येथे रविवारी शेकापचा कार्यकर्ता मेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here