Home जालना जंक फुड खाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – प्रा. बी.वाय. कुलकर्णी

जंक फुड खाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – प्रा. बी.वाय. कुलकर्णी

26
0

आशाताई बच्छाव

1000756312.jpg

जंक फुड खाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – प्रा. बी.वाय. कुलकर्णी
जालना, (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-आजच्या युगात प्रत्येक जण धावपळीत आहे.
त्यामुळे आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. या धावपळीत प्रत्येक जण
जंक फुड खाण्याकडे कळत न कळत वळत असतो. परंतु त्याचे परिणाम त्याच्या
आरोग्यावर गंभीरपणे होतांना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी
घ्यावी व घरचा आहार घ्यावा, असे प्रा. बी.वाय. कुलकर्णी आवाहन त्यांनी
केले.
-जालना शहरातील शांतीनिकेतन नर्सिग कॉलेजमध्ये आयोजित  कॉलेजच्या पहिल्या
बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमप्रसंगी  विद्यार्थी व
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,गणेश
महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, उद्योजक महेंद्र देशपांडे, माजी जि.प.
सदस्य हरिहर शिंदे, प्रा. राम कदम, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश
काठोठीवाले, संचालक अश्विन अंबेकर, प्राचार्या लियंता निर्मल, प्रा.
धनंजय सोनवणे, पांडूरंग काळे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना प्रा. बी.वाय. कुलकर्णी म्हणाले की, कोरोना काळात
डॉक्टर व परिचारिका त्यांचे कार्याचे महत्व सर्वांनीच जाणले. आपल्या
जीवावर उदार होवून त्यांनी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी कठोर परिश्रम
केले. आज या महाविद्यालयात शिकून परिचारिका होत असलेल्या
विद्यार्थ्यांनीही अत्यंत चांगले ज्ञान घेवून भावी आयुष्यात रुग्णांची
चांगली सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालना
शहरातील अभ्यासु व्यक्तीमत्व व शहराचे वैभव असलेले प्रा. बी.वाय.
कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून शांतीनिकेतन नर्सिग
कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलतांना सांगितले.

Previous articleआसेगाव येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा
Next articleमौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here