Home जालना लातूर येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे-वसंतराव...

लातूर येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष

46
0

आशाताई बच्छाव

1000751131.jpg

लातूर येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक १६/०९/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की, १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो याचेच औचित्य साधून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दोन दिवशीय समितीचे १४ वे महाअधिवेशन लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन १७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर असे दोन दिवसाचे राहणार असून या अधिवेशनात वीर माता, वीर पत्नी, वीर जवान, आणि वीर पिता व स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. नामदार संजयजी बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात संघटनेचे अविरत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या महाअधिवेशनामध्ये राज्यासह ,देशातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवावी आणि शासन व प्रशासन यांना संघटनेची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
या अधिवेशनामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्षांनी दिली आहे. या संघटनेच्या अधिवेशनात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या पाहुणच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना धडकी भरल्याशिवाय राहाणार असे मत राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतरावजी देशमुख यांनी व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाला ले.कर्नल सैनिक कल्याण अधिकारी लातूर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती हे असणार आहेत. संघटनेचे काम घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे गाव खेड्यामध्ये संघटनेचा कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निस्वार्थ समाजाची सेवा करुन एक आदर्श निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश हिताचे व समाज हिताचे त्या दृष्टीने काम करण्याची गरज असुन यामुळे प्रशासनाची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.यासाठी १७ व १८ सप्टेंबर रोजी लातूर येथे होणाऱ्या दोन दिवशीय महाअधिवेशनामध्ये सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Previous articleमाहोरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
Next articleजनसेवा मित्र मंडळाकडून गणेश फेस्टिवल उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here