Home भंडारा गोसेखुर्द प्रकल्प बाधित उर्वरित गावांचे पुनर्वसन तात्काळ पुनर्वसन करा – जिल्हाधिकारी यांना...

गोसेखुर्द प्रकल्प बाधित उर्वरित गावांचे पुनर्वसन तात्काळ पुनर्वसन करा – जिल्हाधिकारी यांना निवेदन

314
0

आशाताई बच्छाव

1000738743.jpg

गोसेखुर्द प्रकल्प बाधित उर्वरित गावांचे पुनर्वसन तात्काळ पुनर्वसन करा – जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)गोसेखुर्द प्रकल्प बाधित उर्वरित गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतचे निवेदन आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 ला जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की,सालेबर्डी, कारधा, करचखेडा ,खमारी, दवडीपार व इतर गावात गोसेधरणामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे गावातील घरे पुरामध्ये आहेत .त्यामुळे 20 वर्षांपूर्वी धरणाच्या बाधित गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते 20वर्षे लोटूनही पुनर्वसन झाले नाही. त्या ठिकाणी शासनाच्या घरकुल योजना राबविण्यात येत नाही .जुने घर असल्यामुळे मोरकळीत आल्याने पुराच्या पाण्यामुळे घर उध्वस्त होत असल्याने गावाचे पुनर्वसन तात्काळ करणे आवश्यक आहे .आज दिनांक 12.9.2024ला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने पूर परिस्थिती पाहून निवेदनास तात्काळ मान्य करावे .
तसेच गोसेधरणात शेतजमीन बुडीत क्षेत्रात असल्यामुळे या कुटुंबांना रोजगार नसल्यामुळे आणि घरात असलेला अन्नधान्य पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे यांना कमीत कमी एक लाख रुपये आर्थिक पॅकेज देण्यात यावा त्यामुळे लोकांचे उदारनिर्वाह होईल.
तसेच गावाचे पुनर्वसन झाले नाही तर येणाऱ्या पुरामध्ये संपूर्ण गाव जलसमाधी घेईल याची शासनाने नोंद घ्यावी व जबाबदार शासन व प्रशासन राहील. निवेदन देताना पुनर्वसन समितीचे शासकीय सदस्य भाऊ कातोरे ,प्रमिला शहारे, शेषराव रामटेके अतुल राघोरते, मंजुषा आंबेडारे ,शिवशंकर देवगडे, नर्मदा मेश्राम ,निर्मला बोंद्रे ,हर्षद सोनवणे , छबुबाई भुरे ,पौर्णिमा कांबळे ,पुष्पा भुरे, रोशन बेंदेवार, पंकज गोडाणे,सोनू धारगावे, ह कल्पना निंबार्ते,सुभाष बागडे ,संजय भुरे, गणेश बोंद्रे ,राजू भुरे ,रोशन बेंदेवार ,आकाश शेंडे, व इतर प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here