Home भंडारा ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर क्षितिजा जोंधळे नी घेतली...

ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर क्षितिजा जोंधळे नी घेतली गरुड भरारी…

66
0

आशाताई बच्छाव

1000735879.jpg

ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून
मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर

क्षितिजा जोंधळे नी घेतली गरुड भरारी…

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी) नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार कै. रवींद्र जोंधळे यांची कन्या कु. क्षितिजाने पोलीस दलातील वेगवेगळ्या चाचण्यामध्ये आपल्या मेहनतीचा ठसा उमटवून अखेर ती महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली. त्यानिमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने तिच्या पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंह ठाकूर, मराठवाडा महिला अध्यक्षा वैशालीताई हिंगोले, नांदेड जिल्हा अध्यक्ष मारोती शिकारे तसेच लोहा तालुका सल्लागार सोपान जाधव हे उपस्थित होते.

सविस्तर वृत्त असे की, कु. क्षितिजा जोंधळे ही सिडको नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जोंधळे यांची कन्या आहे. वडिलांनेही पत्रकारितेमध्ये बरेच नावलौकिक मिळवले होते. त्यांनी अनेक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कामे केले होते, अनेक वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले होते. ते उच्चशिक्षित असल्याने आपल्या मुलावर सुद्धा चांगले संस्कार पाडले होते.

क्षितिजाचे पूर्वीपासूनच पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न होते. तसे तिने आपल्या वडिलांना बोलून पण दाखवले होते. सण 2021 ला पोलीस भरतीचे क्लासेस वडिलांनी लावून दिले होते, पोलीस भरतीची तयारी चालू होती. वर्दीत येऊन वडिलांसमोर उभं राहावं हे तिचं स्वप्न होतं. पण अखेर तिचं स्वप्न भंगल. 30 डिसेंबर 2022 रोजी वडिलांचं छत्र हरवलं, वडिलांच्या प्रेमापासून लेकरं पोरकी झाली, पण जोंधळे परिवारातील सर्वांनीच लेकरांना आधार दिला. क्षितिजानेही वडिलांच्या दुःखात न राहता स्वतःला सावरून घेतले. वडीलाचं स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीनं अभ्यासाला सुरुवात केली. वडिलांच्या निधना नंतर अवघ्या वीस महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली. तिने अखेर वडिलांसमोर दिलेलं वचन आज पूर्ण केलं आहे. खाकी वर्दीतील क्षितिजाला पाहून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात आहेत.

क्षितिजाने ठरवलेलं ध्येय सत्यात उतरण्यासाठी अतोनात मेहनत घेऊन, जिद्दीच्या जोरावर यश संपादन करून एक गरुड भरारी घेतली आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
—————————————-
चौकट.
———
“क्षितिजाने वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनोमनी शपथ घेतली, पोलीस भरतीची तयारी चालू केली, अवघ्या 20 महिन्यातच क्षितिजाने वडिलांचे स्वप्न साकार केले. संकटाच्या छाताडावर पाय देऊन, येणाऱ्या संकटाशीच सामना करीत क्षितिजा ही क्षितिजाच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाली.”
—————————————-

Previous articleप्रबोधनकार संघटनेच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्यांचा सत्कार
Next articleलोकशाही युवा फाउंडेशन चे शाखा अध्यक्ष पदी मजहर खाॅंन पठाण यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here