Home विदर्भ हळद पिकाचे हजारो हेक्टर क्षेत्र अधिकच्या पावसाने बाधित पीक विमा नसल्याने लाभापासून...

हळद पिकाचे हजारो हेक्टर क्षेत्र अधिकच्या पावसाने बाधित पीक विमा नसल्याने लाभापासून राहणार शेतकरी वंचित

112
0

आशाताई बच्छाव

1000725503.jpg

हळद पिकाचे हजारो हेक्टर क्षेत्र अधिकच्या पावसाने बाधित पीक विमा नसल्याने लाभापासून राहणार शेतकरी वंचित
हिंगोली,( श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ)- हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अधिकच्या पावसाने हाळदपीकाची नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळख आहे एवढेच नव्हे तर हिंगोली करायच्या हळदीला जी नाईन नामांकन सुद्धा मिळाले आहे
हळद उत्पादन घेत असताना या वर्षी लागवडीला पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल बियाणासाठी शेतकऱ्याला खर्च करावा लागला आहे त्यानंतर पीक जोपासणीसाठी विविध रोग प्रामुख्याने हळद पिकावर येत असतात यामध्ये कंदमाशी खोडकिडा करपा हुमणी अशा असंख्य रोगाला प्रतिबंध करण्यासाठी औषधी वर सुद्धा मोठा खर्च होत असतो पण यावर्षी 15 टक्क्याने हळद लागवड जिल्हाभरात क्षेत्र वाढले होते सुरुवातीला पाऊस कमी असल्याने वाढलेल्या क्षेत्रफळाची कमी पावसामुळे उगवण क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड सुरुवातीला सहन करावा लागला होता त्यानंतर आता अडीच ते तीन महिन्यातच निसर्गाच्या अधिकच्या पावसाने जिल्हाभरातील 1000 हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र पावसाने बाधित झाल्याचे पाहायला मिळत आहे
पण आता ह्याच हळदलागवड उत्पादक शेतकऱ्यांना लाभापासून दूर राहावं लागणार आहे हळद पिकाला पिक विमा नसल्याने शेतकरी यापासून दूर राहणार आहे त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्याला दुहेरी फटका बसणार आहे .
शासनाकडे वेळोवेळी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी हिंगोली उपविभागीय अधिकारी वसमत व माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे सुद्धा मागणीही आमदार व मंत्री असताना लोकप्रतिनिधी मार्फत सुद्धा मागणी केली होती पण अनेक वेळा मागणी करून सुद्धा शासनाने अद्याप तरी कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा पासून कोसो दूर ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बाधित झालेल्या क्षेत्रफळाची पाहणी करताना लोकप्रतिनिधी पालकमंत्री मोठा गाजावा करुन फोटो काढत आहेत पण हळद उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही लाभ पिक विमा नसल्याने मिळणार नाही शासन किती मदत देते त्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे पण हक्काचा पिक विमा नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील लागवड केलेल्या हळद उत्पादक शेतकेतरी बांधवांना आता आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागनार आहे . त्यामुळे यानंतर तरी शासन दरबारी हिंगोली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील हळद पीक विम्यासाठी शासन दरबारी प्रश्न मार्ग लावतील का अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

Previous article13 वर्षीय मुलीचा बलात्कार चेहऱ्यावर दगड ठेचून खून
Next articleवसमत शहरात‌ सणासुदीच्या काळात शासकिय ईमारती व सार्वजनिक ठिकाण बनले दारूड्याचे आड्डे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here