Home जालना राज्यातील मुलींनी आता शिक्षणाबरोबर स्वरक्षणाचे व शस्त्राचेही धडे घ्यावे-वसंतराव देशमुख

राज्यातील मुलींनी आता शिक्षणाबरोबर स्वरक्षणाचे व शस्त्राचेही धडे घ्यावे-वसंतराव देशमुख

33
0

आशाताई बच्छाव

1000674528.jpg

राज्यातील मुलींनी आता शिक्षणाबरोबर स्वरक्षणाचे व शस्त्राचेही धडे घ्यावे-वसंतराव देशमुख
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक २३/०८/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की, राज्यात महिला व मुलीवरील अत्याचार व बलात्काराच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून हि बाब समाजासाठी घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आया बहिणींवर दिवसा अत्याचार होत असतील तर हे पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय लांछनास्पद व समाज मन हेलावून टाकणारे आहे . यासाठी मुलींनी आता शिक्षणाबरोबर संरक्षणाचे व शस्त्राचेही धडे घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केवळ राजकारण केले जात असून समाजहिताचे कोणतेच निर्णय राज्यातील सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो परंतु जनतेच्या हिताचे व राज्यातील माय -बहिनिंच्या संरक्षणासाठी कोणताच कठोर कायदा करून त्याची कठोर अंमलबजावणी केली जात नाही.गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना वाचवण्यासाठी व त्याला अभय मिळवून देण्यासाठी सर्वच राजकीय पुढारी व नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात आणि त्याकामी पोलीस यंत्रणाही गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मदत करतांना दिसते.बदलापुर येथील घटनेवरून हेच सिद्ध झाले आहे.परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा या सर्व घटनांचा बारीक विचार करावा आज ही वेळ दुसऱ्यांवर आहे ठीक आहे परंतु तीच वेळ आपल्यावर केंव्हा येईल हे सांगता येत नाही.आणि यांचे मुख्य कारण म्हणजे गुन्हेगाराला जात नसते त्याची एकच जात असते आणि ती म्हणजे गुन्हेगारी.
बदलापूर येथील चिमुरड्या मुलींवर एका नराधमाने शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर राज्यात अनेक घटना बाहेर येत आहेत.यावरुण राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे कोलमडली असल्याचे सिद्ध झाले आहे.राज्यसरकारने लाडकी बहिण हि योजना आणली परंतु कोवळ्या लाडक्या भाचीचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.कोवळ्या कळ्या फुलण्याच्या आधीच खुडून टाकल्या जात आहेत याला जबाबदार कोण? तेव्हा सगळ्या फुकट योजना बंद करून महिलांना संरक्षण देण्यासाठी उपाय योजना करावी आणि राज्यातील मुलींना आता शिक्षणाबरोबर स्वरक्षणाचे व शस्त्राचेही धडे देण्यात यावे जेणेकरून मुली व महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम होतील आणि ती काळाची गरज आहे असे मत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे .

Previous articleस्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहिला पाहिजे –डॉ. किशोर आंबेगावकर
Next articleसाक्री तालुक्यातील बदलापूर येथे झालेल्या लहान चिमूरडीवर अत्याचार विरोधात साक्री तहसिलदारांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here