Home संपादकीय संपादकीय ….. पुरोगामी महाराष्ट्राला झाले तरी काय? तर “या” नराधमांचा चौरंगा करा!!

संपादकीय ….. पुरोगामी महाराष्ट्राला झाले तरी काय? तर “या” नराधमांचा चौरंगा करा!!

68
0

आशाताई बच्छाव

1000660829.jpg

संपादकीय …..
पुरोगामी महाराष्ट्राला झाले तरी काय? तर “या” नराधमांचा चौरंगा करा!!
वाचकहो,
अगदी अलिकडच्या काही दिवसांत घडणाऱ्या घटना बघितल्या तर डोकं अक्षरशः सुन्न व्हायची वेळ येऊन ठेपली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्रात अगदी निरागस असलेल्या निरपराध निष्पाप कोवळ्या बालिकांवर नीच नराधम अन्वनीत अत्याचार करून त्यांचा बळी घेत असल्याच्या घटना पाहिल्यावर वाटायला लागते.हाच का तो आमचा पुरोगामी महाराष्ट्र.साधूसंताची शिकवण लाभलेल्या या महाराष्ट्रात सध्या वासनांध सैतानांनी थैमान घातले आहे.परनारी मातेसमान ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या महाराष्ट्रात साफ धुळीस लावण्याचे महापाप या वासनांध सैतानांनी ठिकठिकाणी केल्यामुळे शरमेने मान खाली घालण्याची वेळ या सुसंस्कृत महाराष्ट्र राज्यात निर्माण होत चालली आहे.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलांचे हातपाय तोडून त्यांचा चौरंगा केला होता अगदी तशाच न्यायाची अपेक्षा आता सगळेच करीत आहेत.म्हणजे असे कुणाच्या लेकीबाळीचे आयुष्य नासवून त्यांचेवर अत्याचार करण्याचे धाडस निदान कुणी करणार तरी नाही.आपल्या येथील कायद्यात असलेली शिथीलता व पळवाटा शोधून हे नराधम वारंवार स्त्रीयांवर अत्याचार करीत असतात.कोपर्डीच्या घटनेतील नराधम गुन्हेगार आजही शासकीय पाहुणचारावर जगत आहेत.मग कसली आली भिती! वास्तविक संताच्याच भाषेत सांगावयाचे झाले तर “तुका म्हणे ऐसा नरा,मोजूनही माराव्या पैजारा” खरं तर महिलांनी आता आपले संरक्षण करण्यासाठी स्वतः च सरसावले पाहिजे त्याशिवाय या अशा हैवानांना लगाम बसणार नाही.आम्ही सलाम करतो त्या उत्तरप्रदेशातील फुलनदेवीला स्वतः वरील बलात्काराचा स्वतः च निकाल लावला.बलात्कार करणा-या सातही नराधमांना रांगेत उभे करुन त्यांचा खातमा केला.तर याच कलियुगात वारणेच्या खो-यात व कृष्णा नदीच्या काठावर नावलौकिक करून गेलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांच्या नावाची करामत आजही पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या गौरवाने सांगितली जाते.कोणत्याही महिलेकडे वाईट बघून तिची छेड काढणाऱ्या किंवा अत्याचार करणाऱ्यास बापूचा कायदा जागीच धडा शिकवून त्याला जन्माची अद्दल घडवीत होता.आज गरज आहे, आपल्या मायमाऊलींचे व लेकीबाळीचे संरक्षण करण्यासाठी गावागावात एक तरी बापू जन्माला येण्याची तरच कुणी कुणाच्या आया बहिणी कडे वाईट बघणार नाही, अत्याचार करणार नाही अथवा छत्रपतीचे नाव घेऊन कुणाच्या मायमाऊलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार नाही.तरच बदलापूर असो, अथवा कोल्हापूर अकोला किंवा नाशिक या घटनांना आळा बसेल व खरे अर्थाने महिला वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वावरत आहोत याचा अनुभव घेऊन खुल्या श्वासाने जगतील व हिंडू फिरु शकतील.एव्हढेच यानिमित्ताने!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक

Previous articleमाहोरा परिसरात जोरदार पाऊस पडल्याने पिकांना मिळालं जीवदान
Next articleजायखेडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोरीच्या ३५ मोटरसायकली केल्यात जप्त दोन चोरट्यांना अटक !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here