Home बुलढाणा कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्राणिशास्त्र विभागात अभ्यास मंडळाची स्थापना

कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्राणिशास्त्र विभागात अभ्यास मंडळाची स्थापना

32
0

आशाताई बच्छाव

1000659426.jpg

कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्राणिशास्त्र विभागात अभ्यास मंडळाची स्थापना.

ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा:
सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्राणीशास्त्र विभागात दिनांक १६ऑगस्ट२०२५ रोजी या शैक्षणिक वर्षातील प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या निमीत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन तर प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.मेघा सोळंके व कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित होते.अभ्यास मंडळाच्या उद्धाटनप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष म्हसाळ, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.नित्यानंद डहाके, प्रा.डॉ.नंदकिशोर मोरे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाच्या या उद्धाटन प्रसंगी प्रा.म्हसाळ, प्रा.डहाके व प्रा.डॉ.मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान प्राणीशास्त्र अभ्यास मंडळातील सदस्यांचे नावे विभाजन करत त्यांच्या नावाची घोषणा विभागप्रमुख प्रा.डॉ.मेघा सोळंके यांनी केली. तसेच प्राणीशास्त्र अभ्यास मंडळातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातील, विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवीला पाहीजे असे जाहिर केले. कार्यक्रमाचे संपुर्ण रुपरेषा प्राणीशास्त्र विभागामार्फत ठरविण्यात आली होती. यानिमीत्त डॉ.मेघा सोळंके, प्रा.डॉ.माधुरी हिंगणकर, प्रा.सोनाली तायडे. प्रा. सुशील देशमुख तसेच प्रा.नम्रता ढोरे व प्रा.जया जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Previous articleकोलकाता येथील ‘त्या’ हत्याकांड प्रकरणी संग्रामपूर येथे डॉक्टरांचे निषेध आंदोलन! कडक कारवाईची मागणी
Next articleउरण जासई येथील खुनाचा उलगडा; पत्नीच्या प्रेम संबंधातून मित्राची हत्या !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here