Home उतर महाराष्ट्र विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनातच विकसित केली पाहिजे – सर्जेराव मते

विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनातच विकसित केली पाहिजे – सर्जेराव मते

37
0

आशाताई बच्छाव

1000654661.jpg

विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनातच विकसित केली पाहिजे – सर्जेराव मते

कोपरगाव,(दिपक कदम).. आई-वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य देखील शिक्षक करत असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन सर्जेराव मते यांनी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानादरम्यान बोलताना केले.
श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवता असते. आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामाच्या अभंगवाणीतून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे सांगितले तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा व नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते मते यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य के एल वाकचौरे यांनी स्वागत केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा ढवळे हिने केले.
मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही ठेवली.

Previous articleमाजी विद्यार्थी संघाकडून देगलूर महाविद्यालयात वृक्षारोपण.
Next articleसाकोली येथे साकोली बंद विषयी विचार विनियमकरण्याकरता बैठक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here